esakal | पाटाच्या पाण्यात दोन अल्पवयीन मुलांचा बुडुन मृत्यु !
sakal

बोलून बातमी शोधा

drowned

पाटाच्या पाण्यात दोन अल्पवयीन मुलांचा बुडुन मृत्यु !

sakal_logo
By
राजू कवडीवाले

यावल : येथील सुर्दशन चित्र मंदीर परिसरातील दोन लहान अल्पवयीन मुले (Children) हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) कालव्यात (canal) पोहण्यासाठी गेले असता, बुडुन (Drowning) मरण पावल्याची दुदैवी घटना घडली आहे. या घटनेचे वृत कळताच सुदर्शन चित्र मंदिर परिसरासह शहरात एकच शोककळा पसरली आहे.

(hatnur dam canal two children drowned)

हेही वाचा: शेतीवरून वाद विकोपाला; एकाचा मृत्यू..नातेवाइकांचा रास्ता रोको

याबाबत वृत्त असे, की येथील सुदर्शन चित्र मंदिर परिसरातील स्वामी विवेकानंद नगरातील गणेश निळकंठ दुसाने ( सोनार) ( वय 16) इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी , दीपक जगदीश शिंपी ( वय 12) इयत्ता सहावीत शिकणारा विद्यार्थी व इतर दोन मित्र मिळून चारही मित्र बुधवारी (ता. 5) दुपारी साडेबारा ला पोहण्यासाठी बोरावल रस्त्यावरील हतनूर धरणाचे कालव्यात पाणी सोडले असल्यामुळे तेथे पोहण्यासाठी गेले असता, गणेश दुसाने व दीपक शिंपी हे दोघं पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडत असतांना त्यांना वाचविण्याचा दोघांनी प्रयत्न केला, मात्र त्यात ते अयशस्वी ठरले.

हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

पोहण्यासाठी उतरले आणि..

या कालव्यात पुर्ण क्षमतेचे पाणी शेत पिकांसाठी सोडण्यात आले असुन त्यातील एक मुलगा हा पाण्यात पोहण्यासाठी उतरला असता तो वाहुन जात असल्याचे पाहुन त्यास वाचविण्यासाठी गणेश दुसाने याने एकास काठीच्या सहाय्याने वाचविले, पण तो पाण्यात पडुन मरण पावल्याची घटना घडली. त्यांच्या अन्य मित्रांनी घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरड केली. पण त्यांना मदत मिळु शकली नाही . त्यांना पाण्यात वाहुन जात असल्याचे पाहुन त्याला वाचविण्यासाठी या मुलांने मदत केली. पण दुदैवाने पाण्यात प्रवाह अधिक वेगाने असल्याने ती दोन मुले पडुन वाहुन गेल्याची दुदैवी घटना घडली आहे.

गाळ, जाळीत अडकले होते मृतदेह

दरम्यान आज भल्या पहाटे साडेचार - पाच वाजेपासुन बुडालेल्या दोघं मुलांचा शोध घेण्यासाठी कालव्याच्या पाण्यात आठ पट्टीच्या पोहणाऱ्यांकडुन शोध घेतला गेला. तब्बल सहा- साडेसहा तासानंतर दोघांचे मृतदेह कालव्याच्या पाण्यात गाळात आणि जाळीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. टेंभी कुरण येथील बारेला कुटुंबातील पट्टीचे पोहणाऱ्यांनी मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. गणेश व दीपक रात्र झाली तरी घरी का आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला. किंबहुना त्यांचे सोबत असलेल्या दोघं मित्रांना सोबत घेऊन रात्रीपर्यंत शोध घेतला मात्र शोध न लागल्यामुळे त्या दोघं मित्रांना विश्वासात घेऊन विचारापूस केली असता त्यांनी गणेश व दीपक कालव्याच्या पाण्यात बुडाले असल्याचे सांगितले. तोपर्यत खूप रात्र झाली होती.आज पहाटे लवकर पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावून शोध मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा: आमच्याकडे काही जादूची कांडी नाही ! डॉक्टरांचे भावनिक आवाहन

कुटूंबाचा आक्रोश..

दीपक शिंपी व गणेश दुसाने हे दोघं येथील सरस्वती विद्या मंदिरातील विद्यार्थी होत. दीपक हा त्याच्या परितक्त्या आईचा एकुलता कुल 'दीपक ' होता. तर गणेश दुसाने हा घरात सर्वात धाकटा होता. त्यास एक भाऊ व दोन बहिणी आहेत.दोन्ही कुटुंबात आज सकाळपासून आक्रोश सुरु होता.

(hatnur dam canal two children drowned)