esakal | वादळी तडाखा..केळीच्या बागा उद्ध्वस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Storm blow banana farm

वादळी तडाखा..केळीच्या बागा उद्ध्वस्त

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चोपडा (जळगाव) : तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे (Storm blow) पश्चिम भागातील मोहिदा व वढोदा येथील केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून, यात ऐन कापणीला आलेल्या केळीबागा उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. (chopda-taluka-Storm blow-Banana-orchards-destroyed-farmer-loss)

हेही वाचा: ते गेले पण त्‍यांच्या नावाचा वापर; डॉ. सुपेकरांच्या नावे ५० हजारांची लूट

तालुक्यातील पश्चिम भागातील मोहिदा, वढोदा परिसरातील गावांत नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे केळीचे सर्वाधिक नुकसान झाले असून, दुष्काळग्रस्त शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या पायथ्याशी व चोपडा तालुक्यात असलेल्या वढोदा व मोहिदा येथे

९० लाखाचे नुकसान

वादळी वाऱ्यामुळे ३० ते ३५ हेक्टरवरील ८० ते ९० लाख रुपयांच्या केळीचे नुकसान झाले आहे. यात मोहिदा येथील विजय पाटील, मनोहर पाटील, डॉ. पवन पाटील यांच्यासह ५० ते ६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाकडून पंचनामे झाले आहेत. ऐन कापणीवर आलेली केळी वादळाने जमीनदोस्त झाल्यामुळे डोळ्यादेखत लाखो रुपयांचे नुकसान झाले, हे सांगताना शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.