..तर हॉस्पिटलचा परवाना रद्द करा : खासदार रक्षा खडसे

raksha khadse
raksha khadse

चोपडा (जळगाव) : सिटी स्कॅन सेंटरचालकांनी दर्शनी भागावर रेट बोर्ड लावणे व बिल देणे बंधनकारक आहे, तसेच रेमेडेसीव्हर इंजेक्शन बाराशेच्यावर विकणे चुकीचे असून, त्यावर प्रशासनाचे नियंत्रण असावे, तसेच खासगी कोविड हॉस्पिटलला महात्मा फुले योजनेचा लाभ मिळाला पाहिजे; अन्यथा संबंधित हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्याच्या सूचना खासदार रक्षा खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच मेडिसिन घेण्याची सक्ती करणाऱ्या खासगी हॉस्पिटलवर कारवाईचे संकेत दिले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, प्रांताधिकारी सीमा अहिरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुमीत शिंदे उपस्थित होते. 
येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खासदार रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली चोपडा तालुक्यातील कोविडसंदर्भात विविध विषयांवर बैठक झाली. बैठकीत खासदार खडसे यांनी मेडिसिन घेण्याची सक्ती करणाऱ्या खासगी हॉस्पिटलवर कारवाईचे संकेत दिले, तसेच खासगी कोविड हॉस्पिटलने दर्शनी भागात दरपत्रक लावणे व बिल देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. लसीकरणाची गती वाढवावी व गावपातळीवरील समिती सक्रिय करावी, अशा विविध सूचनांसह अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
खासदार खडसे यांनी त्यांच्या प्रयत्नातून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले होते. या व्हेंटिलेटरची विल्हेवाट मधल्या काळात दुसरीकडेच लावण्यात आली होती. तरी हे व्हेंटिलेटर दोन दिवसांत जसेच्या तसे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. 
सिटी स्कॅनची गैरसोय, अवाजवी किंमत घेणे, बिल न देणे, रुग्णांना ताटकळत ठेवणे तसेच रेमेडेसिव्हर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणे, खासगी हॉस्पिटलच्या बाहेर दर्शनी भागात शासकीय दरपत्रक लावणे तसेच खासगी कोविड सेंटरला महात्मा फुले हमी योजनेचा लाभ मिळणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. 

सर्वेक्षण सुरू
तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी शहरी व ग्रामीण भागाची कोविडची सध्याची परिस्थिती विशद केली. पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांनी शहरात २८ पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगितले. बैठकीस तहसीलदार अनिल गावित, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नायब तहसीलदार राजेश पऊळ, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज पाटील, डॉ. गुरुप्रसाद वाघ, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, पालिका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला, गटविकास अधिकारी बी. एस. कोसोदे, भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जयस्वाल, नरेंद्र पाटील, आत्माराम म्हाळके, शिवसेना गटातून पंचायत समितीचे माजी उपसभापती एम. व्ही. पाटील, नरेश महाजन, राजेंद्र पाटील, विकास देशमुख, राजाराम पाटील, महेंद्र धनगर आदी उपस्थित होते. 

बैठकीत प्रश्‍नांचा भडिमार 
उपस्थितामधून अनेकांनी प्रश्नांचा व समस्यांच्या भडिमार केला. त्यात वेले येथील उपसरपंच दीपक पाटील यांनी गावपातळीवर कोरोनाच्या रुग्णांना मदत करणारे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य कोरोनायोद्धा आहेत व त्यांना कोरोनाची लस मिळावी, तर ‘आरटीपीसीआर’चे रिपोर्ट दहा ते बारा दिवसांपर्यंत येत नाहीत, तोपर्यंत सदर रुग्णामार्फत कोविडचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला असतो. तर अहवाल तत्काळ मिळावा, अशी मागणी पंचायत समिती माजी उपसभापती एम. व्ही. पाटील यांनी केली. रेमेडेसिव्हरचा शहरात काळाबाजार होत असल्याचा आरोप करीत आत्मपरीक्षणाचा सल्लादेखील दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com