चिंता वाढतीच..दिवसभरात १७ मृत्यू

corona death
corona death

जळगाव : जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात आढळून आलेल्यापेक्षा बरे होणारे रूग्ण अधिक आहेत. मात्र चिंतेची बाब म्‍हणजे दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला. यात एरंडोल तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. 
जिल्‍ह्‍यातील मागील चोवीस तासांचा अहवाल प्राप्त झाला असून, यात जिल्ह्यात आज १ हजार १६७ बाधित रूग्ण आढळून आले. तर १ हजार १७६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. यामध्ये जळगाव शहरासह चोपडा, भुसावळ तालुक्यात वाढता संसर्ग कायम आहे. 

११ हजार चाचण्या
कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ९९ हजार ४५६ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ८५ हजार ९८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित ११ हजार ७०९ बाधित रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहे. मागील चोवीस तासात १० हजार ७८३ चाचण्या घेण्यात आल्‍या असून यात १ हजार १६७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले. 

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर १६०, जळगाव ग्रामीण ४४, भुसावळ १८०, अमळनेर ७५, चोपडा १६३, पाचोरा ४४, भडगाव ३४, धरणगाव ४७, एरंडोल ४१, जामनेर ७४, रावेर ३९, पारोळा ५, चाळीसगाव ५१, मुक्ताईनगर ४४, बोदवड ३ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकुण १ हजार १६७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.

एका दिवसात आतापर्यंत सर्वाधित मृत्‍यू
कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्या आकडा वाढताच आहे. गेल्‍या काही दिवसांपासून एका दिवसात चौदा- पंधरा रूग्‍णांचा मृत्‍यू होत होता. मात्र आज १७ जणांचा मृत्‍यू झाला असून, हा आतापर्यंत एका दिवसात मृत्‍यू झालेल्‍यांचा सर्वात मोठा आकडा आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com