दिलासा : जिल्‍ह्‍यात केवळ २६ जणांना कोरोनाची बाधा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 January 2021

जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होवू लागला आहे. मागील महिनाभरापासून नवीन बाधितांची संख्या कमी येत असल्‍याने ॲक्‍टीव्ह रूग्‍णंची संख्या देखील पाचशेच्या आत आली आहे.

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोना संसर्गाची लागण झालेल्‍या नवीन रूग्‍णांची संख्या घटली आहे. दोन दिवसानंतर आज जिल्‍ह्‍यात एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाली. तर २९ रूग्‍ण बरे होवून घरी गेले आहे.

जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा संसर्ग आता कमी होवू लागला आहे. मागील महिनाभरापासून नवीन बाधितांची संख्या कमी येत असल्‍याने ॲक्‍टीव्ह रूग्‍णंची संख्या देखील पाचशेच्या आत आली आहे. आज प्राप्त कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २६ नवीन बाधित आढळून आल्‍याने आतापर्यंत एकुण ५६ हजार ७९१ बाधित रूग्ण आढळून आलेत. त्यापैकी ४७३ रूग्ण ॲक्‍टीव्ह असून कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत. तर ५४ हजार ९६७ रूग्ण बरे होवून घरी परतले असल्याचे अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

असे आढळले रूग्ण
जळगाव शहर ८, भुसावळ २, अमळनेर १, चोपडा ३, भडगाव २, धरणगाव १, रावेर ५, चाळीसगाव-३, मुक्ताईनगर १ येथे एकूण २६ रूग्‍ण आढळले. तर जळगाव ग्रामीण, पाचोरा, यावल, एरंडोल, जामनेर, पारोळा, बोदवड या सात तालुक्‍यात एक देखील रूग्‍ण आढळून आला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus update new patient ratio down