बरे झालेल्यांचा आकडा ५५ हजार पार; जिल्ह्यात ३३ नवे कोरोना बाधित

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जुलै, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरनंतर कमी होऊ लागला आहे. पूर्ण नियंत्रणात नसला तरी संसर्गाचे प्रमाण घटले आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.

जळगाव : सप्टेंबरपासून कोरोना संसर्गाचा खाली येणारा आलेख जानेवारीत काही प्रमाणात वाढल्याचे दिसत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा ५५ हजार पार गेला आहे. रविवारी ३३ नवे बाधित आढळले, तर ५२ रुग्ण बरे झाले. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग जुलै, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरनंतर कमी होऊ लागला आहे. पूर्ण नियंत्रणात नसला तरी संसर्गाचे प्रमाण घटले आहे. तसेच बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. रविवारी प्राप्त १६०० चाचणी अहवालांमध्ये नवे ३३ बाधित आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५६ हजार ८४६ झाली आहे. तर ५२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडाही ५५ हजार ६३वर पोचला आहे. रविवारी एकाही मृत्युची नोंद नाही, ही दिलासादायक बाब ठरली. 

असे आढळले रुग्ण 
रविवारी जळगाव शहरात ८, भुसावळला ७, पारोळ्याला ७, चाळीसगाव ४, भडगाव २, अमळनेर, चोपडा तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला. 

धुळे जिल्ह्यात नवे नऊ कोरोनाबाधित 
धुळे : जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकुण रुग्णसंख्या १४ हजार ७७२ झाली. धुळे शहरात गोपाळनगर, पवननगर, गणेशनगर, जीटीपी स्टॉप, कैलासनगर, श्रीकृष्ण मंदिराजवळ, सुदर्शन कॉलनी, न्हावी कॉलनी, तसेच तरवाडे (ता. धुळे), शिरपूर क्षेत्रात वारूळ, कोडीद आणि साक्री येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news coronavirus update recover patient cross 55 thousand