रिक्षात बसवून लुटण्याचा रोजचाच धंदा; रात्रीच्या प्रकरणात अडकले अन्‌ सापडले पोलिसांच्या ताब्‍यात

रईस शेख
Sunday, 28 February 2021

रिक्षा शोधत असतांना पुर्वीपासूनच चार प्रवासी बसलेल्या रिक्षा थांबवली. एकाने खाली उतरुन त्यांना मधोमध बसवले.

जळगाव : बुट विक्रेता बाबुलाल डिगांबर निंबोरे (वय ७१ बुर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) या परप्रांतीय व्यावसायिकाला लुटल्याच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलिसांनी छडा लावला आहे. रिक्षाच्या क्रमांकावरुन संशयितांचा शोध घेत अटक करण्यात आली. 

बुट व्यवसायीक बाबुलाल डिगांबर निंबोरे (वय ७१) शनिवारी रात्री अकराच्या सुमारास शहरातील राजकमल चौकातून घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत असतांना पुर्वीपासूनच चार प्रवासी बसलेल्या रिक्षा थांबवली. एकाने खाली उतरुन त्यांना मधोमध बसवले. राजकमल चौक ते पांडे चौकादरम्यान रिक्षातील चौघांनी निंबोरे यांच्या खिशातील ४ हजार ५०० रुपयांची रोकड व १ हजार १०० रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ५ हजार ६०० रुपयांचा ऐवज काढून घेत रिक्षातून उतरवुन दिले होते. 

देाघांना अटक दोघे फरार 
दाखल गुन्ह्यात रिक्षाचा नंबर (एमएच. १९ व्ही. ६६८१) शोधुन काढत पोलिसांनी रिक्षामालक ईश्‍वर संतोष भोई यास ताब्यात घेतले. त्याने बंटी नंदू महाले (रा. मयुर कॉलनी), अमोल ईश्‍वर भोसले व राहूल नावाचा तरुण अशा तिघांसोबत गुन्हा केल्याची कबूली दिली. पोलिसांनी ईश्‍वर भोई यास अटक करुन गुन्ह्यात रिक्षा जप्त केली. ईश्‍वर भोई व संतोष भोसले अशा देाघांची पोलिस कोठडीत रवानगी झाली. ससरकारपक्षातर्फे ऍड. रंजना पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान या गुन्ह्यात बंटी महाले व राहूल नावाचा तरुण हे दोघेही फरार असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news auto riksha seat and passenger robbery