
मुलगा गौरव पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक असुन दोघांचे तेथे जाणे येणे असते. महाजन दाम्पत्य २२ जानेवारीपासून घरबंद करुन पुणे येथे मुलाकडे गेलेले होते. ते सोमवारी सकाळी घरी परतले असता, घराच्या मुख्य दाराचे कुलूप तुटलेले दिसले
जळगाव : शहरतील टेलीफोननगर भागातील सेवानिवृत्त मधुकर काशिराम महाजन (वय ६२) यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. घरातील संपुर्ण साहित्य उलथापालट केली. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मग रिकाम्या हाताने परतावे लागत असताना त्यांनी जातांना घरात लावलेले सिसीटीव्हीचे साहित्यच काढून नेले.
शहरातील टेलिफोननगर येथे मधुकर काशीराम महाजन व पत्नी कल्पनाबाई वास्तव्यास आहेत. महाजन दाम्पत्याचा मुलगा गौरव पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक असुन दोघांचे तेथे जाणे येणे असते. महाजन दाम्पत्य २२ जानेवारीपासून घरबंद करुन पुणे येथे मुलाकडे गेलेले होते. ते सोमवारी सकाळी घरी परतले असता, घराच्या मुख्य दाराचे कुलूप तुटलेले दिसले.
पती- पत्नीनेही संपुर्ण घराची केली पाहणी
कडीकोयंडा उघडून महाजन दाम्पत्य घरात शिरले. घरातील कपाट, लाकडी पलंग, आणि इतर साहित्याची संपुर्ण उलथा पालट करुन कपडे, सामान अस्ताव्यस्थ फेकण्यात आले होते. वरच्या मजल्यावरही तसाच प्रकार आढला. त्यानंतर मुधकर महाजन यांनी घरात लावलेले सिसीटीव्ही तपासले असता, कपाटाच्यावरील सिसीटीव्हीचा डीव्हीआर, टाटा स्काय कंपनीचा सेटटॉप बॉक्स, राऊटर असा एकुण ७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे आढळून आले आहे. महाजन यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पेलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
घर उलथापालट तरी..
महाजन यांच्या दोन मजली घराची उलथा पालट करुन चोरट्यांनी निवांतपणे संपुर्ण घरात झडती घेतली. बेडरुम- किचन हॉल सर्व ठिकाणचे सामान अस्ताव्यस्त केल्यानंतरही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, चोरट्यांच्या संपुर्ण हालचाली सिसीटीव्हीत कैद झाल्या असल्याने चोरीचा माल तर मिळाला नाही; उलट चोरी करतांना आपण आल्याने पुरवा नको म्हणुन चोरट्यांनी घरातील सीसीटिव्ही कॅमेरा यंत्रणाच चोरुन नेली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे