
पिझ्झा मागवण्यासाठी गुगल सर्चवर डॉमिनोज पिझ्झाचा नंबर शोधला. तेथे नमुद असलेल्या 8537015314 मोबाईल नंबरवर संपर्क करुन पिझ्झाची ऑर्डर बुक केली.
जळगाव : शहरातील जिवन विकास कॉलनीतील शिक्षीकेने गुगल सर्च इंजिन वरुन मिळवलेल्या मोबाईल नंबरवर फोन करुन डॉनिनोज् पिझ्झा ऑर्डर केला हेता. समोरुन पिझ्झा डिलीव्हरी पुर्वीच पेमेंट(पैसे) द्यावे लागतील म्हणुन स्वतंत्र लिंक पाठवली. त्या लिंकवर क्लिक करुन इन्स्टॉल करताच शिक्षीका सिमी शरद दुबे यांच्या खात्यातून चक्क ५० हजार रुपये विड्रॉल झाल्याची तक्रार जिल्हापेठ पोलिसा ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सिमी शरद दुबे (वय २८) या शिक्षीका असून जिवन विकास कॉलनी येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. गुरुवार(ता.२५) रोजी सव्वा नऊ वाजता त्यांनी पिझ्झा मागवण्यासाठी गुगल सर्चवर डॉमिनोज पिझ्झाचा नंबर शोधला. तेथे नमुद असलेल्या 8537015314 मोबाईल नंबरवर संपर्क करुन पिझ्झाची ऑर्डर बुक केली. समोरील व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने पेमेंट देण्याचा आग्रह करुन तक्रारदार दुबे यांच्या मोबाईलवर लिंक पाठवली.
क्षणात खाते झाले खाली
लिंकला इन्स्टॉल केल्यावर दिलेला नंबर टाकल्यानंतर सिमी दुबे यांच्या स्टेटबँकच्या खात्यात असलेल्या रकमेतून चक्क ५० हजार रुपये विड्रॉल झाल्याचा संदेश आला. संबधीत व्यक्तीला फोन केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने आपली फसवणुक झाल्याचे आढळून आल्याने सिमी दुबे यांच्या तक्रारीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारका विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे करत आहेत.
ासंपादन ः राजेश सोनवणे