
धरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथक मदतीला दाखल झाले. घटनास्थळावर २२ जुगारी ५२ पत्त्यांच्या साहिल्याने जुगार खेळतांना आढळून आले
जळगाव : धरणगाव तालूक्यातील पाळधी येथील हॉटेल रेहिणीच्या पाठीमागे चालवल्या जाणाऱ्या जुगार अड्ड्यावर रात्री उशिरा छापा टाकण्यात आला. पथकाने २२ जुगाऱ्यांसह तब्बल ५ लाख ८६ हजार रुपये इतका मुद्देमाल व जुगारचे साहित्य जप्त केले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्या सुचनेवरुन उपविभागात व जिल्ह्यातील अवैध धंद्यावर छापेमारी साठी परिवीक्षाधीन डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्यासह कर्मचारी संदिप बिऱ्हाडे, प्रकाश कोकाटे, फारुख शेख, अमोल करर्डेकर,विजय अहिरे, अमोल ठाकुर यांचे खास पथक तयार केले आहे. पथकातर्फे अवैध धंद्यावर कारवाईचे सत्र सुरु आहे. या पथकाने मंगळवार(ता.१९)च्या रात्री पाळधीतील हॉटेल रोहिणी गाठली. परिसराची पहाणी करुन मिळालेल्या गुप्त माहितीची खात्री केल्यावर छापा टाकण्यात आला.
पाच लाखाचा मुद्देमाल
धरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथक मदतीला दाखल झाले. घटनास्थळावर २२ जुगारी ५२ पत्त्यांच्या साहिल्याने जुगार खेळतांना आढळून आले असून त्यांच्या कडील रोख रकमेसह जुगाराचे साहित्य आणि मुद्देमाल असा एकुण ५ लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. धरणगाव पोलिस ठाण्यात याप्रकरणी संशयीतांच्या विरुद्ध मुंबई जुगार ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
यांना अटक व गुन्हा दाखल
नुरा गुलाम पटेल, निसार शहा मस्तान शहा, योगश अरुण ढाके, समाधान अर्जुन माळी, विक्रम श्रीराम सपकाळे, मनोज मगन बाविस्कर, अमोल रामकृष्ण सपकाळे, नारायण रामचंद्र पाटिल, सुनल देवा धनगर, रविंद्र अशोक भोई, पिरन पिंजारी, विलास सुधाकर माळी, योगेश राजेंद्र चौधरी, मुकेश उत्तम महाजन, राजु जगन्नाथ बडगुजर, प्रकाश कोही, नदिम शेख, योगराज हरी पाटिल यांच्यासह इतर अशा एकुण २२ संशयीतांना अटक करण्यात आली आहे.
संपादन ः राजेश सोनवणे