सलग चौथा दिवस; भररस्‍त्‍यावर दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावून सुसाट

रईस शेख
Sunday, 17 January 2021

रस्त्याने जात असलेल्या तरूणाच्या हाताला झटका देवुन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाइल लांबवल्याची घटना शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

जळगाव : शहरातील प्रतापनगर येथील अनुव्रत भवनसमोर रस्त्याने जात असलेल्या तरूणाच्या हाताला झटका देवुन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाइल लांबवल्याची घटना शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. १७) सकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
धुळे जिल्ह्यातील साक्री येथील मूळ रहिवाशी शंकर कोळेकर (वय २५) हा तरुण नोकरीनिमित्ताने शिवकॉलनी परिसरात राहतो. शंकर हा ऑर्किड हॉस्पिटल येथे पार्टटाइम जॉब करतो. शनिवारी रात्री ऑर्किड हॉस्पिटलमधून काम आटोपल्यानंतर शंकर हा नेहमीप्रमाणे घराकडे पायी जात होता. पाऊणे ११ वाजेच्या सुमारास प्रतापनगरातील पोलिस लाइन जवळील अणुव्रत भवनसमोर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शंकर याच्या हाताला झटका देत त्याचा चार हजार रूपये किंमतीचा मोबाइल लांबवला. काही कळण्याच्या आत मोबाइल हिसकावून नेल्यानंतर तिघेही पसार झाले. 

सलग मोबाइल लांबवण्याच्या घटना 
गुरुवार : काव्यरत्नावली चौक : विजया सुनिल पवार (वय-३६) 
शुक्रवार : बहीणाबाई उद्यान : मोबाईल हिसकावला 
शनिवार : सागरपार्क : शुभम दिलीप भिरुड (वय २४ ) 
रविवार : शिवकॉलनी परिसर : शंकर बापू कोळेकर (वय-२५) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news crime news snatched the mobile coming from the bike