
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाचा निषेध असो, ईडी झाली येडी अशा घोषणा देण्यात आल्या.
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना ‘ईडी’ने नोटीस बजावल्यच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाल राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र शासनाचा निषेध असो, ईडी झाली येडी अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पीता पाटील, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, वाल्मीक पाटील, प्रदीप भोळे, अजय बढे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा महानगराध्यक्ष अभिषेक पाटील म्हणाले, कि भाजपकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या तसेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या विरोधात ‘ईडी’ची चौकशी लावली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसअसा प्रकार खपवून घेणार नाही. केंद्र शासनाने ही नोटीस मागे घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही त्यांनी दिला आहे.
भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागा : मसुरकर
रावेर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकावा, या दृष्टीने प्रत्येकाने जोमाने कामास लागावे, असे आवाहन शिवसेना रावेर विधानसभा संपर्क प्रमुख मोहन मसुरकर यांनी येथे व्यक्त केले. ‘गाव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक’ या उपक्रमांतर्गत सभासद नोंदणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन त्यांनी केले.