esakal | बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर; जळगाव जिल्‍ह्‍यात एक लाखावर बाधितांची कोरोनोवर मात

बोलून बातमी शोधा

corona fight

बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर; जळगाव जिल्‍ह्‍यात एक लाखावर बाधितांची कोरोनोवर मात

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे (coronavirus) बाधित झालेल्या १ लाख २४ हजार ६४६ रुग्णांपैकी १ लाख १२ हजार ३५६ रुग्णांनी कोरोनावर मात (recovery ratio) केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१४ टक्क्यांवर पोहोचले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (collector abhijit raut) यांनी दिली. (fight with coronavirus and recovery ratio up jalgaon district)

हेही वाचा: नियम लावूनही एकेनात..दहा दुकानांना लावले सील

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने राबविलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क्यांच्यावर पोहोचले होते. मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर १० फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले होते. तर ३१ मार्च रोजी हे प्रमाण ८४.९२ टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु त्यानंतरच्या काळातही जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. शिवाय मृत्युदर कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.

हेही वाचा: अफवांचा पेव म्‍हणून घरच्यांचा विरोध; तीने मात्र झुगारला अन्‌ केले लसीकरण

२०८ अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी आजपर्यंत ९ लाख ४८ हजार ७०८ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १ लाख २४ हजार ६४६ अहवाल पॉझिटीव्ह तर ८ लाख २२ हजार ९९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या अवघे २०८ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी होत आहे.

आकडे बोलतात..

जिल्ह्याची सध्याची कोरोना रुग्णांची स्थिती

ा- होम क्वारंटाईन रुग्ण-- ६ हजार ६१९

- विलगीकरणात रुग्ण--५८८

- उपचार घेत असलेले रुग्ण-- १९ हजार ५५

- त्यापैकी लक्षण नसलेले--७ हजार ४३२

- लक्षणे असलेले रुग्ण-- २ हजार ६२३

- ऑक्सीजनवर असलेले रुग्ण-- १ हजार ३३८

- अतिदक्षता विभागात असलेले रुग्ण--७६३