esakal | पहिले लग्‍न लपवत केला दुसरा विवाह; दुसऱ्या पत्‍नीचाही सुरू केला छळ
sakal

बोलून बातमी शोधा

harassing wife

पहिले लग्‍न लपवत केला दुसरा विवाह; दुसऱ्या पत्‍नीचाही सुरू केला छळ

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : पहिले लग्न लपवून ठेवत उच्चशिक्षीत तरूणीशी दुसरे लग्न करून तिचा शारीरीक व मानसिक छळ केला. तसेच वेळोवेळी तिला अनैसर्गिक कृत्य करण्यासह बेकायदा गर्भपात करण्यास भाग पाडले व माहेरून पैसे आणले नाही; म्हणून छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या विरोधात मेहूणबारे पोलीस (Mehunbare police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (first-marriage-concealed-the-second-marriage-and-harassing-his-second-wife)

व्‍हीडीओ दाखवून अनैसर्गिक कृत्‍य

तेवीस वर्षीय उच्चशिक्षीत तरूणीचा विवाह ३० मार्च २०२१ रोजी तालुक्यातील उंबरखेड येथे विकास सुरेश केदार याच्याशी झाला. विकास हा एसटीआय (एमपीएससी) मार्फत नोकरीला आहे. लग्नात सुमारे ७ लाख रूपये खर्च करण्यात आले. विवाहानंतर तरूणी सासरी गेल्यानंतर पती त्याच्या मोबाईलवरून अश्लिल व्हिडीओ दाखवून तिची इच्छा नसतांना तिला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडत होता.

हेही वाचा: लग्नाच्या निम्म्या खर्चासाठी पत्नीचा छळ; पोलिसात तक्रार

घरातून दिले हाकलून

पतीकडून वारंवार होणाऱ्या या वर्तनाने विवाहीतेला धक्काच बसला. त्यानंतरही तिला शिवीगाळ करून नाशिक येथे बदली करण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये आणण्यास सांगितले. तसेच तिची इच्छा नसतांना देखील तिला गर्भपात करण्यास भाग पाडले व घरातून हाकलून दिले. विशेष म्हणजे पती सीआयटी पदावर नसून टँक्स खात्यात क्लार्क आहे; मात्र ही बाब पतीने लपवून या तरुणीचा विश्वासघात केला.

अखेर पोलिसात धाव

सासरच्या छळाला कंटाळून या विवाहीतेने मेहूणबारे पोलीसात धाव घेतली. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती विकास सुरेश केदारे, सासू रेखा सुरेश केदारे व नणंद पुजा सुरेश केदारे यांच्या विरोधात मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभाष पाटील हे तपास करीत आहेत.