सात उद्योजकांना लावला चुना; सुरतच्या ठगबाजांना अटक

fraud
fraud

जळगाव : जळगावचा डाळ उद्योग लुटण्याचा कट गुजरातच्या भामट्यांनी आखून तब्बल सात उद्योजकांची ४५ लाख रुपयांची फसवणूक करून माल फस्त केला आहे. दाल उद्योजक रमेशचंद्र जाजू यांच्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात अटकेतील नीलेश सुदाणी (वय ३९, रा. योगी चौक, वराछा, सुरत) याला मंगळवारी (ता. १३) न्यायालयात हजर केल्यावर त्याला १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले. 
एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून दोन दिवसांपूर्वी नीलेश सुदाणी (वय ३९) याला अटक केली होती. अटकेनंतर दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत संशयिताने कबुली देत बऱ्यापैकी गुन्ह्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे या गुन्ह्यात तो एकटाच नसून व्यापारी उद्योजकांना ठगणारी संपूर्ण टोळीच कार्यरत असल्याचे त्याने सांगितले. त्या सर्व संशयितांचे खरे नाव, पत्ते सुदाणी याला माहिती असून, दोन दिवसांचा पोलिस रिमांड संपल्यावर मंगळवारी त्याला न्या. श्रीराम यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे ॲड. क्षीरसागर यांनी गुन्ह्याची व्याप्ती आणि पूर्वनियोजित कटकारस्थान रचून गुन्हा घडविण्यात आल्याचे न्यायालयात मांडले. संशयितांच्या इतर साथीदारांची ओळख पटली असून, त्यांच्या अटकेसाठी संशयिताला गुजरात (सुरत) येथे नेले असल्याने न्यायालयाने संशयित नीलेश सुदाणी यास १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत रवाना केले आहे. 

या व्यापाऱ्यांना लावला चुना 
रमेशचंद्र जाजू (वय ६३, रा. गणपतीनगर) यांच्याकडून १६ लाख ८९ हजार ९५० रुपयांची डाळ मागवून ती फस्त केली. त्याचबरोबर सिद्धार्थ जैन यांची दोन लाख ६३ हजार ९७० रुपयांत, सत्यनारायण बाल्दी यांची दोन लाख ३७ हजारांत, दिनेश राठी यांची नऊ लाख ३६ हजार ९० रुपयांत, पुष्पक मणियार यांची एक लाख ३१ हजार १५ रुपये, अविनाश कक्कड यांची दोन लाख ७० हजारांत व किशोरचंद भंडारी यांची दहा लाख ३८ हजार ८६३ रुपये अशा पद्धतीने या सात व्यापाऱ्यांना एकूण ४५ लाख ६६ हजार ८८८ रुपयांत चुना लावला. 

पाच संशयित निष्पन्न 
अटकेतील नीलेशने दिलेल्या माहितीनुसार फसवणूक करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्धरित्या प्लॅन करून अंजिठा चौकातील हॉटेल महिंद्रा येथे बनावट ओळखपत्र दाखवून रूम बुक केली होती. एका मागून एक उद्योजकांना वेगवेगळ्या नावाने संपर्क करून लाखो रुपयांना गंडविण्यात आले. अटकेतील संशयित नीलेश वल्लभदास सुदाणी याच्यासह मुकेश कथोरोटिया (रा. सुरत), केतन कपुरिया (राजकोट, सुरत), अरविंद क्वाडा आणि रुषी देसाई अशा एकूण पाच संशयितांची नावे समोर आली आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com