
अंधारात बापासाठी मुलगीच बनतेय प्रकाशवाट !
भडगाव : एकीकडे कन्या नको, वंशाचा दिवा मुलगाच हवा, असा अट्टहास धरला जातो. मात्र, अंजनविहिरे (ता. भडगाव) येथील सरपंच (Sarpanch) सपना पाटील यांची मुलगी (girl) १९ वर्षीय गायत्रीने वडिलांना (father) कोरोनानंतर (corona) उद्भवलेल्या बुरशीजन्य आजाराच्या उपचारासाठी मदतीची हाक देऊन खऱ्या अर्थाने वंशाचा दिवाच नाही तर पणतीही तितकीच सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. तिच्या या धडपडीला समाजाने पुढे येऊन मदतीच्या रूपाने बळ देण्याची गरज आहे. (help daughters treat sick father tries)
हेही वाचा: जळगाव शहरात लशींचा तुटवडा, लसीकरण पुन्हा ठप्प !
अंजनविहिरे येथील सरपंच सपना पाटील व त्यांचे पती शशिकांत पाटील हे कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सतत ग्रामस्थांच्या मदतीसाठी फ्रंटलाइनवर होते. मात्र, शशिकांत पाटील यांना कोरोनाने घेरले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातून ते बरे झाले. मात्र, कोरोनानंतर आलेल्या बुरशीजन्य आजाराने त्यांच्यावर हल्ला केला.
आर्थिक भार पेलवेना
शशिकांत पाटील यांना कोरोना झाला त्यावेळी त्यांच्या पत्नी सपना पाटील यांनी घरात असलेले सर्व पैसे खर्च केले. प्रसंगी व्याजाने पैसे काढून पतीवर उपचार केले. त्यामुळे ते कोरोनातून बरे झाले. मात्र, त्यांना पुन्हा बुरशीजन्य गंभीर आजार जडल्याने धुळे येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. आता नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. या आजारासाठी खूप मोठा खर्च आहे. यासाठी सात हजार रुपये किमतीचे (liposomal amphotericin) इंजेक्शन द्यावे लागते. सपना पाटील यांच्या भावाने बँकेतून पाच लाखाचे कर्ज काढून उपचारासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत. आतापर्यंत ९६ इंजेक्शन दिले गेले आहेत. पुन्हा ३२ इंजेक्शन लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा: शेतकऱ्यांना आता..अनूदानावर मिळणार बियाणे !
कन्येची बापासाठी मदतीची हाक
शशिकांत पाटील यांची कन्या गायत्री हिने वडिलांच्या उपचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. ज्याला मदत करायची असेल त्यांनी थेट आर्थिक मदत करावी, आवश्यक असणारे इंजेक्शन घेऊन दिले तरी चालेल, असे तिने म्हटले आहे. तिच्या या मदतीच्या हाकेला जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वडिलांना वाचविण्यासाठीच्या गायत्रीच्या धडपडीला अनेकांनी कौतुकाची थाप दिली आहे. गायत्रीच्या वडिलांना कोणाला मदत करायची असल्यास गायत्रीच्या ७४३५९३११८४ किंवा ज्ञानेश्वर पाटील यांच्या ७८४१९४५३९१ भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
माझ्यासाठी माझे वडील सर्वस्व आहेत. ते आज अडचणीत आहेत. त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आईकडे जेवढे पैसे होते ते खर्च झाले. मामांनी बँकेतून कर्ज काढून आम्हाला मदत केली. ज्यांना शक्य असेल त्यांनी आम्हाला मदत करावी.
-गायत्री पाटील
(help daughters treat sick father tries)
Web Title: Marathi News Bhadgaon Father Tries Help Daughters Treat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..