esakal | जळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

highway work in fourway

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळे व जळगाव जिल्ह्यात फागणे- तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यांत चौपदरीकरणाचे काम होत आहे. पैकी तरसोद- चिखली टप्प्यातील काम ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले

जळगावातील चौपदरीकरणात महामार्गाचे दोन टप्पे ठरले सावत्र 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : महामार्गावर फागणे- तरसोद व तरसोद- चिखली या दोन टप्प्यांसह जळगाव शहरातील सात किलोमीटरचा मार्ग चौपदरी होत असताना पाळधी बायपास ते तरसोद फाट्यापर्यंत महमार्गावरील पाच- सहा किलोमीटरचे दोन टप्पे सावत्र ठरले आहेत. महामार्गावरील हा भाग आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाला असून, या दोन्ही टप्प्यांत केवळ साइडपट्ट्या दुरुस्ती तेवढी केली जाणार आहे. 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर धुळे व जळगाव जिल्ह्यात फागणे- तरसोद व तरसोद- चिखली अशा दोन टप्प्यांत चौपदरीकरणाचे काम होत आहे. पैकी तरसोद- चिखली टप्प्यातील काम ७० टक्क्यांपेक्षा अधिक झाले असून, फागणे- तरसोद कामानेही आता वेग घेतला आहे. 

शहरातील मार्गही प्रगतिपथावर 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी विशेष बाब म्हणून सात किलोमीटरच्या टप्प्यासाठी ६१ कोटींच्या कामाची निविदा मंजूर होऊन शहरातील हा टप्पाही मार्गी लागला आहे. या कामानेही वेग घेतला असून, आतापर्यंत ५० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. 

सहा किलोमीटरचे टप्पे उपेक्षित 
धुळे व जळगाव जिल्ह्यातील १४० किलोमीटरचा महामार्ग चौपदरी होत असताना जळगाव शहराला लागून असलेले दोन टप्पे मात्र या कामात उपेक्षित राहिले आहेत. पाळधीपासून बायपास निघालेला चौपदरी महामार्ग थेट तरसोद फाट्यापर्यंत आहे. मात्र पाळधी बायपास पॉइंट ते जळगाव शहरातील खोटेनगरपर्यंतचा साडेतीन किलोमीटरचा व पुढे कालिंकामाता चौक ते तरसोद फाटा हा अडीच किलोमीटर हे दोन टप्पे सावत्र ठरले आहेत. 

केवळ साइडपट्ट्यांची होणार दुरुस्ती 
राष्ट्रीय महामार्ग बायपास गेल्याने उर्वरित दोन्ही टप्प्यांशी आता महामार्ग प्राधिकरणाशी संबंध नाही, त्यामुळे बांभोरी पुलासह हे दोन्ही भाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग झाले आहेत. बांधकाम विभागाने या टप्प्यातील मार्गाचे रुंदीकरण करण्याचे ठरवले असून, त्यात साइडपट्ट्या दुरुस्त करून त्यावरच थोडेफार रुंदीकरण होईल. त्यामुळे पाळधी बायपासपासून जळगाव शहरापर्यंत व येणाऱ्या वाहनांसाठी वाहतुकीची समस्या कायम राहील. 
 
महामार्गावर पाळधी बायपास ते खोटेनगर व पुढे कालिंकामाता मंदिर चौक ते तरसोद फाट्यापर्यंतचा रस्ता बांधकाम विभागाकडे वर्ग झाला आहे. त्यावरील दुरुस्ती व साइडपट्ट्यांच्या कामासाठी कार्यादेशही देण्यात आले आहेत. 
-प्रशांत सोनवणे (अधीक्षक अभियंता)  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image