
आयटीआयच्या शेवटच्या वर्षाच्या पेपर दिल्ली येथील डीजीईटी संस्था घेत आहे. यापूर्वी कारपेंटर, वेल्डर या पदासाठी परिक्षार्थी कमी असल्याने ऑनलाईन परिक्षा घेताना अडचण आली नाही. मात्र आज फिटर, इलेक्ट्रीशिअन च्या परिक्षेला विद्यार्थी संख्या अधिक होती.
जळगाव : दिल्ली येथील ‘डीजीइटी’तर्फे आज देशभरात ‘आयटीआय’च्या फिटर व इलेक्ट्रीकल्सच्या शेवटचा वर्षाचा पेपर ऑनलाइन होता. थेअरी व गणिताचा पेपर होता. सकाळी दहा ते बारा वेळेत परिक्षा असताना साडेपर्यंतही ऑनलाईन पेपर ओपनच झाला नाही. दिल्ली येथूनच सिस्टम बंद पडल्याने परिक्षार्थींचा गोंधळ उडाला. अखेर आजचा पेपर रद्द करावा लागला. शहरातील परिक्षार्थींनी शासकीय आयटीआयमध्ये येवून याप्रकरणी नोडल अधिकारी, प्राचार्यासमोर समस्या मांडल्या. मात्र त्यांनीही हतबलता दर्शवित विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत.
आयटीआयच्या शेवटच्या वर्षाच्या पेपर दिल्ली येथील डीजीईटी संस्था घेत आहे. यापूर्वी कारपेंटर, वेल्डर या पदासाठी परिक्षार्थी कमी असल्याने ऑनलाईन परिक्षा घेताना अडचण आली नाही. मात्र आज फिटर, इलेक्ट्रीशिअन च्या परिक्षेला विद्यार्थी संख्या अधिक होती. सोबतच परिक्षार्थ्यांचे सेंटरही लांब अंतरावर देण्यात आले होते. चोपडा येथील विद्यार्थ्यांला जळगावला, तर जळगावच्या विद्यार्थ्यांला पाचोरा येथे देण्यात आले होते. त्याचबरोबर ऑनलाईन परिक्षेची तयारी यंत्रणेतर्फे करण्यात आली नव्हती.
परिक्षा रद्द झाल्यास..
राज्य शासनाचे अधिकारी दिल्ली येथील डीजीईटीच्या अधिकाऱ्यांना ऑनलाइन परिक्षा न घेण्याविषयी सांगत असताना दिल्लीचे अधिकारी तूम्हाला परिक्षा घ्यावीच लागेल असा दबाव टाकत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नूकसान कोण भरून देईल असा आरोप करीत विद्यार्थी, पालक आयटीआयमध्ये आले होते. याबाबत शासकीय आयटीआयच्या प्राचार्यांशी संपर्क साधला असता झाला नाही.
संपादन ः राजेश सोनवणे