मार्केटला खरेदीचा केलाय प्लॅन; तर अगोदर हे वाचा, जळगावातील मार्केटबाबत आहे वेगळा निर्णय

jalgaon market
jalgaon market

जळगाव : महापालिकेत सत्ता बदल होताच गाळे धरकांवर कारवाई करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ महापालिकेचे व्यापारी संकुल उद्यापासून (ता.२६) बेमुदत बंद करण्यात येणार आहे.
जळगाव शहर महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्ष बंडू काळे यांच्या उपस्थितीत छत्रपती शाहू मार्केट येथे सर्व १६ मार्केटच्या अध्यक्षांची व पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत राजस कोतवाल, संजय पाटील, युवराज वाघ, तेजस देपुरा, पंकज मोमाया, वसिम काझी, सुरेश पाटील, विलास सांगोरे, रिजवान जागीरदार, प्रकाश गागडाणी, रमेश तलरेजा, सुजित किनगे, शैलेन्द्र वानखेडकर, हेमंत परदेशी, शिरीष थोरात, अमोल वाणी, अमित गौड उपस्थीत होते.

गाळा सीलची कारवाई
केवळ गाळेधारकांच्या जिवावर उठलेल्या मनपा प्रशासनाच्या प्रवृत्तीला कुठलाही धरबंद आता राहिलेला नाही. महात्मा गांधी मार्केट येथील उत्तम कलेक्शन हा गाळा मनपा अधिकाऱ्यांतर्फे मार्केटमध्ये जाऊन सील करण्यात आला. तसेच मनपा अधिकारी इतर गाळेधारकांना पैसे भरण्यास दबाव आणत आहेत.

पालकमंत्र्यांनी दिले आहे आश्‍वासन
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील यांनी स्वतः आश्वासन दिलेले आहे, कि नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी चर्चा करुन गरीब, मध्यमवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल गाळेधारकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी लवकरच बैठक लावून या विषयी निर्णय घेण्यात येईल. तसेच पालकमंत्री यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत गाळेधारकांच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन पोहोचवण्यात आले आहे. पालकमंत्री स्वतः मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीवर याबाबत बोलले. असे सर्व असताना सुद्धा मनपातर्फे अशी कठोर कारवाई करण्यात आली आहे. 

संघटनेने दिलाय इशारा
जळगाव शहर मनपा प्रशासनाच्या या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी शुक्रवारपासून (ता.२६) सर्व १६ अविकसीत, अव्यवसायिक मार्केट योग्य न्याय मिळेपर्यंत बेमुदत बंद करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात गाळेधारक फार मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला असतानाही मनपा प्रशासन पशुतुल्य वागणुकीने आमचा संसार देशोधडीला लावणार असेल तर आम्हीही हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरू. कोरोना काळातील या जमावाला मनपा प्रशासन जबाबदार असेल. असा इशाराही संघटनेने दिला आहे.

हे मार्केट राहतील बंद
रामलाल चौबे मार्केट, महात्मा गांधी मार्केट, जुने बी.जे. मार्केट, डॉ.आंबेडकर मार्केट, धर्मशाळा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, भास्कर मार्केट, भोईटे मार्केट, जुने शाहू मार्केट, रेल्वे स्टेशन जवळील दुकाने, शामाप्रसाद मुखर्जी उद्यान लगत मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, वालेचा मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, शिवाजी नगर दवाखान्या जवळील दुकाने, निर्मलाबाई लाठी शाळा इमारत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com