esakal | जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची एन्ट्री 
sakal

बोलून बातमी शोधा

eknath shinde

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यांचे तब्बल ५७ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक आहेत. अशा स्थितीत सत्ताबदल अशक्य आहे. मात्र, भाजपच्या तब्बल ३१ नगरसेवकांनी बंड केले आणि ते शिवसेनेला मिळाले.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेंची एन्ट्री 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : जळगाव जिल्ह्याचे राजकारण आता नवीन वळण घेत आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते व राज्याचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगाव महापालिकेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री घेतली आहे. महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता खालसा करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे दिसत आहे. 
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यांचे तब्बल ५७ नगरसेवक आहेत, तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक आहेत. अशा स्थितीत सत्ताबदल अशक्य आहे. मात्र, भाजपच्या तब्बल ३१ नगरसेवकांनी बंड केले आणि ते शिवसेनेला मिळाले. अगोदर जिल्ह्यातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील, तसेच भाजपच्या बंड करणाऱ्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क केला. जळगावात होत असलेले सत्तांतर, तसेच भविष्यात विकासासाठी सहकार्य करण्याची हमी त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर फुटलेले नगरसेवक ठाणे येथे त्यांचाच अखत्यारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

शिंदेचा आश्रय म्‍हणून भाजपचे प्रयत्‍न फसले
शिंदे यांनी भरवसा दिल्यानंतरच जळगावात भाजपचे नगरसेवक फुटल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने फुटीर नगरसेवकांना पुन्हा आपल्याकडे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु हे नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या आश्रयाला असल्याने भाजपचे हे प्रयत्न फळास लागले नाहीत. गुरुवारी (ता. १८) होणाऱ्या महापौर व उपमहापौर मतदानाच्या दिवशी हे बंडखोर नगरसेवक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. जळगावात महापालिकेवर भगवा फडकविण्यात शिंदे यांचा मोठा वाटा असेल. त्याची ही जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एन्ट्री मानली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना आणखी बळकट होणार काय, हे आगामी काळात दिसून येईल. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image