वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू?

वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा मृत्यू?
death
deathdeath

कजगाव (जळगाव) : येथील एका वयोवृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा आरोप संबंधिताच्या नातेवाइकांनी केला. या प्रकरणी चौकशीची मागणी होत आहे. (kajgaon primary health center women death no treatment)

वाडे (ता. भडगाव) येथील वयोवृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी कजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Kajgaon Primary Health Center) आणले होते. त्या वेळी रुग्णावर तत्काळ उपचार न करता आरोग्य केंद्राच्या आवारात ताटकळत उभे करून ठेवल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, वेळेवर उपचार न मिळाल्याने त्या महिलेचा आवाराच्या बाहेर मृत्यू झाला. आरोग्य केंद्रातील बेजबाबदारपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

death
जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज; पण सहकारींचा डोळ्यासमोर मृत्‍यू

शववाहिका नसल्याने तारांबळ

आरोग्य केंद्र आवारात महिलेचा मृतदेह पडून असताना प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली होत नव्हत्या. मृतदेह स्वतः गाडी मागवून घरी घेऊन जाण्यास सांगण्यात येत होते. परंतु सोबत एकटा असलेला मुलगा आपल्या आईला शववाहिका मिळत नसल्याने तारांबळ उडाली होती. अखेर गावातील एकाने पॅजो रिक्षा वाहन आणले. तेव्हा कोठे अंत्यसंस्कार करण्यासाठी मुलगा आपल्या आईला घेऊन घरी गेला. परंतु याप्रसंगी आरोग्य केंद्रातील संवेदनशून्यतेमुळे मुलाचे डोळे पाणावले.

महिलेचा मृत्यू कशामुळे?

मृत महिलेला तीन-चार दिवसांपासून ताप, श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यासाठी गावातील एका स्थानिक डॉक्टरकडे उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी जास्तच तब्येत खालावली. तेव्हा मुलाने कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. तेव्हा रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, या महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, हे गुलदस्त्यातच असून, चौकशीची मागणी होत आहे.

वाडे येथील महिलेची प्रकृती अगोदरच खालावलेली होती. येथे आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला असून, मृतदेहाची विल्हेवाट किंवा व्यवस्था करणे आमचे काम नाही. आमच्याकडे तशी यंत्रणा उपलब्ध नाही.

-डॉ. प्रशांत पाटील, आरोग्य अधिकारी, आरोग्य केंद्र, कजगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com