लग्‍नपत्रिका छपाई व्यवसायाचे तीन-तेरा; मर्यादीत संख्या त्‍यात भर डिजीटलची

marriage invitation card printing
marriage invitation card printing

अमळनेर (जळगाव) : कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या निर्बंधाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला असतानाच लग्न सोहळे रद्द झाल्याने आणि मर्यादित वऱ्हाडी उपस्थित राहण्याच्या निर्बंधांमुळे लग्नपत्रिका छपाईत घट झाली आहे. यापूर्वी तीनशे ते एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात होती. मात्र आता केवळ ५० ते ६० पत्रिका छपाईची ऑर्डर दिली जात आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. लग्न सोहळ्यावर विविध व्यवसाय अवलंबून असून सध्या लग्नसोहळे साध्या पद्धतीने होत आहेत. केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळा करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेकांनी लग्नसोहळे रद्द करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 

मर्यादीत संख्येने लग्‍नपत्रिकाच गायब
टाळेबंदी पूर्वी एका लग्नसोहळ्यासाठी तीनशे ते एक हजाराहून अधिक लग्नपत्रिका छपाई करण्याची ऑर्डर दिली जात होती. मात्र लग्नाला उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडींच्या संख्येवर मर्यादा आल्याने अनेक जण समाज माध्यमांवरून ठराविक वऱ्हाडींना लग्नाचे निमंत्रण देत होते. तसेच सप्टेंबर ते फेब्रुवारी महिन्यांपर्यंत टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. त्यात लग्नसोहळा करिता ५० ते २०० वऱ्हाडींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. आता पुन्हा निर्बंध लागू झाल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. नोव्हेंबरपर्यंत व्यवसायाला चांगले दिवस आले असताना महिन्याभरापासून लग्न सोहळे रद्द झाल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडलेला आहे; असे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्यावर्षी उन्हाळ्यात कोरोनामुळे पाच ते सहा कोटींचा व्यवसाय बुडाला होता.

व्यवसाय घटण्याची कारणे
- विवाहातील उपस्थिती कमी केली
- सोशल मीडिया वरून दिले जाते आमंत्रण
- केवळ जवळच्या नातेवाईकांनाच निमंत्रण
- अनेक विवाह सोहळे रद्द झाले अथवा पुढे ढकलले
- केवळ औपचारिकता म्हणून पत्रिका छपाईची ऑर्डर.

संपादन- राजेश सोनवणे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com