गणिताच्या गुरुजींना वाढदिवशी आयुष्याच्या ‘बेरजे’चे गिफ्ट!

गणिताच्या गुरुजींना वाढदिवशी आयुष्याच्या ‘बेरजे’चे गिफ्ट!
Heart attack
Heart attacksakal

जळगाव : आयुष्यभर विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देत बेरीज-वजाबाकी शिकविणाऱ्या गुरुजींवर वयाच्या ८० व्या वर्षी अँजिओप्लास्टी (Heart attack angiography operation) करण्यात आली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील हृदयालयाच्या (Dr. Ulhas patil medical collage jalgaon) टीमने ती यशस्वी करत गुरुजींना त्यांच्या वाढदिवशीच पुढच्या आयुष्यातील बेरजेचे गिफ्ट दिले. (jalgaon-maths-teacher-80-year-heart-attack-operation-success)

रावेर तालुक्यातील मस्कावद येथील गुणवंत तुकाराम पाटील (वय ८०) गणिताचे निवृत्त शिक्षक. अचानक त्यांना उच्च रक्‍तदाबाचा त्रास जाणवायला लागला. अचानक स्ट्रोकही येत होते. त्यासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेडिसिनतज्ज्ञ डॉ. पाराजी बाचेवर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर हृदयालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Heart attack
बारावीच्या प्रवेशप्रक्रियेला ऑनलाइन सुरवात

मुख्‍य रक्‍तवाहिनीत ब्‍लॉक

हृदयालयात गुणवंत पाटलांचा ईसीजी, टुडी इको करण्यात आला, त्यात सायलेंट हार्ट ॲटॅक येऊन गेल्याची शक्यता डॉक्टरांना जाणवली. अँजिओग्राफीत डाव्या बाजूच्या मुख्य रक्‍तवाहिनीत ब्लॉक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकते, डॉ. प्रियंका भालके, डॉ. ऋतुराज शिर्के यांचे सहकार्य लाभले.

गप्पांच्या मैफलीत शस्त्रक्रिया..

शस्त्रक्रियेदरम्यान गुरुजींना डॉ. हर्षा देशपांडे यांनी लोकल भूल दिली. यामुळे त्यांना डॉक्टरांशी संवाद साधणे शक्य झाले आणि गुरुजींशी गप्पांची मैफल रंगवत डॉक्टरांनी आपले काम चोख बजावले. ३ जून हा गुणवंत पाटलांचा जन्मदिन. तो अशा प्रकारे हृदयालयातच साजरा झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com