केळीसाठी ‘व्हीपीयू रॅक’ सवलतीच्या दरात द्या; खासदार रक्षा खडसेंची लोकसभेत मागणी

raksha khadse
raksha khadse

मुक्ताईनगर (जळगाव) : केंद्र सरकारने रावेर ते न्यू आझादपूर किसान रेल्वे अथवा व्हीपीयू रॅक सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी लोकसभेत निवेदनाच्या माध्यमातून केली. 
किसान रेल्वे ही जीवनावश्यक घटकांच्या दळणवळण हेतू केंद्र सरकारने सुरू केली. रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण देशभरात जवळपास २०० पेक्षा जास्त किसान रेल्वे कोरोनाच्या काळात सुरू केल्या. या रेल्वेच्या माध्यमातून भाजी, फळ, अन्नधान्याचे छोटे पार्सल मेट्रो शहरांमध्ये थेट पाठविता येण्याची सुविधा ग्रामीण भागातील उत्पादकांना निर्माण झाली. केंद्राच्या या योजनेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या दर्जात्मक मालाला मोठ्या शहरात जास्त मागणी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना मिळालेल्या या उत्पादन संधीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांचा माल मोठमोठ्या शहरांत दररोज आयात-निर्यात करण्यासंबंधीच्या मागणीसाठी किसान रेल्वे अथवा सवलतीच्या शुल्क दरात व्हीपीयू रॅक रावेर ते न्यू आझादपूर (दिल्ली)साठी उपलब्ध करून देण्याचे शेतकऱ्यांमार्फत निवेदन खासदारांनी लोकसभेत केले. 

ओबीसी जात, पोटजातीनुसार डिजिटल जनगणना करावी 
चालू वर्षात येणाऱ्या डिजिटल जनगणनेमध्ये ओबीसीमध्ये समावेश असलेल्या जात व पोटजातीनुसार गणना करण्यात यावी, अशी महत्त्वाची मागणी खासदार रक्षा खडसे यांनी गुरुवारी (ता. १८) लोकसभेत केली. मंडळ आयोगानुसार ओबीसीअंतर्गत ५२ टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक आहेत. मागील १९७९-८० च्या सूचीनुसार मागासवर्ग व समुदायाची संख्या ही साडेतीन हजारांच्या वर होती. जी २००६ च्या जनगणनेनुसार पाच हजारांच्या आसपास पोचली. चालू स्थितीत बघता जवळपास १५ वर्षांनी ओबीसींची जनसंख्या जास्त प्रमाणात वाढलेली निदर्शनास येईल. कारण की विशिष्ट ओबीसी जात व पोटजातींची स्वतंत्र अशी जनगणना झालीच नाही, असे खासदारांनी लोकसभेला सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com