
शिवाजीनगर हुडकोतील रहिवासी विजया सुनिल पवार (वय ३६) काव्यरत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौकात ते आकाशवाणी चौक दरम्यान अॅक्सीस बँकेजवळून पायी जात असतांना २० ते २५ वयोगटातील अज्ञात दोन भामटे दुचाकीवर
जळगाव : काव्यरत्नावली ते आकाशवाणी दरम्यान अज्ञात दोन भामट्यांनी दुचाकीवर येवून शतपावली करणाऱ्या विवाहितेच्या हातातून बळजबरी मोबाईल हिसकावून पळ काढल्याची प्रकार रात्री घडला. रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर हुडकोतील रहिवासी विजया सुनिल पवार (वय ३६) काव्यरत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौकात ते आकाशवाणी चौक दरम्यान अॅक्सीस बँकेजवळून पायी जात असतांना २० ते २५ वयोगटातील अज्ञात दोन भामटे दुचाकीवर येवून विवाहितेच्या हातातून मोबाईल बळजबरी हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. महिलेले आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत दोघे पसार झाले होते. विजया पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे
व्हीआयपी ऐरीया असुरक्षीत
काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी हा संपुर्ण परिसर राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.निकम, न्यायाधीश, जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक आणि इतर महत्वाच्या शासकिय अधीकाऱ्यांचा रहिवास असलेला व्हिआयपी परिसर आहे.चोविस तास वरीष्ठासंह पेालिसांचा राबता या मार्गावर असतांना महिलेच्या हातून मोबाईल हिसकावल्याची घटना घडली. याच परिसरात सुसाट दुचाकी पळवणाऱ्या स्टंट बाईकर्सचाही प्रचंड त्रास आहे.
संपादन ः राजेश सोनवणे