ऑक्सिजन लेव्हल केवळ ५८; जगण्याची आशा होती धुसर, पण दहा दिवसातच बाबांचा लढा यशस्‍वी

ऑक्सिजन लेव्हल केवळ ५८; जगण्याची आशा होती धुसर, पण दहा दिवसातच बाबांचा लढा यशस्‍वी
corona fight
corona fightcorona fight
Updated on: 

भडगाव (जळगाव) : बांबरुड खुर्द (ता. पाचोरा) येथील ८५ वर्षीय विनायक पाटील यांना कोरोनाची (coronavirus) लागण होऊन ऑक्सिजन पातळी (oxygen level) एकदम खालावत ५८ वर गेली. मात्र, आत्मविश्‍वास, सकारात्मक विचार आणि डॉक्टरांचे कौशल्य, याच्या जोरावर दहा दिवसात त्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा आपले घर गाठले आहे. भडगाव ग्रामीण रूग्णालयात (bhadgaon rural hospital) त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. (old man coronavirus fight and recover ten days)

विनायक पाटील त्रास जाणवत असल्याने व ऑक्सिजन पातळी ५८ वर गेल्याने भडगाव रूग्णालयात २० एप्रिलला दाखल झाले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. पाटील यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचार्यांनी त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा केली. त्यांनीही उपचाराला प्रतिसाद दिला. त्यामुळे अवघ्या दहा दिवसांत त्यांनी कोरोनावर मात करत ग्रामीण रूग्णालयातून डिस्चार्ज मिळवला आहे. ते ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. डॉ. पंकज जाधव, डॉ. जवाद अहेमद, डॉ. मोहम्मद अजिब, प्रमोद सतुके, सुनीता पाटील, वैशाली ह्याळिंगे, भावेश हाडपे, निखिल कासार, किरण राठोड, अतुल सपकाळ आदिनी परिश्रम घेतले.

corona fight
बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर; जळगाव जिल्‍ह्‍यात एक लाखावर बाधितांची कोरोनोवर मात

'ते' तर देवदूतच

ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व स्टाफने जीवाची बाजी लावून वडिलांवर उपचार केले. एखाद्या खासगी दवाखान्यात दाखल केले असते तर लाखो रूपयांचे बिल द्यावे लागले असते. मात्र, भडगाव ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने देवदूताची भूमिका निभावली आहे. इतर रुग्णांचीही ते अशाच पद्धतीने सेवा करतात, असे वृद्धाच्या नातेवाईकांनी सांगितले.

विनायक पाटील हे ग्रामिण रूग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल अवघी ५८ होती. मात्र त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिल्यामुळे ते लवकर बरे झाले. दहा दिवसानंतर त्यांना डीस्चार्ज देण्यात आला आहे.

-डॉ. पंकज जाधव, वैद्यकीय अधिकारी, ग्रामिण रूग्णालय भडगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com