esakal | ट्रकचालकाच्या समयसूचकतेने वाचला लाखोंचा फ्रॉड
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

ट्रकचालकाच्या समयसूचकतेने वाचला लाखोंचा फ्रॉड

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : बालाघाट (छत्तीसगढ) येथील भुवन इंडस्ट्रीज या (Bhuwan indushatri balaghat chattisghadh) उद्योगाची लाखो रुपयांची तांब्याची तार रायपूर येथून बालाघाटला आणायची होती. ऑनलाइन पद्धतीने ट्रक बुक करून (online fraud) लाखो रुपयांचा माल एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणार असल्याने ट्रान्स्पोर्टचालकाने ट्रकची माहिती मागितली. समोरच्यांनी चक्क जळगावच्या मेहरुण येथील जावेद शेख यांच्या ट्रकचे फोटो टाकून मालाच्या बुकिंगचे भाडे ऑनलाइन अदा करायला लावले. वेळेतच ट्रकमालक-चालकाची माहिती कळल्यावर थेट बोलणे होऊन फसवणुकीचा प्रकार असल्याचे ट्रकचालकाने संबंधिताच्या निदर्शनास आणून दिल्याने लाखो रुपयांची फसवणूक टळाली आहे. (jalgaon-news-online-fraud-case-truck-driver-return)

हेही वाचा: कोरोनाने धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत १३३ बालकांच्या मायेचे छत्र हिरावले

संपूर्ण भारतात व्यवसाय असलेल्या महेंद्र तुरकर (बालाघाट, छत्तीसगढ ) यांना बालाघाट ते छत्तीसगढ लाखो रुपयांचा माल पाठवायचा होता. ऑनलाइन ट्रकची बुकिंग केल्यावर सायबर गुन्हेगारांनी या उद्योजक व चालकाला हेरले. जळगावच्या नव्याकोऱ्या टाटा ट्रकचे फोटो या उद्योजकाला पाठवले. हा ट्रक रायपूर (छत्तीतसगढ) येथे उभा असल्याचे सांगून तुम्ही तत्काळ ऑनलाइन पद्धतीने पाच हजार भरून बुकिंग करण्याचे सांगितले. खात्री पटण्यासाठी ट्रकचे आरसी बुकचा फोटो, ट्रकचे बुकिंगचे कागदपत्र संबंधित ट्रान्स्पोर्टस‌ला पाठवले.

ट्रक चालकाला केला संपर्क

पैसे खात्यातून ऑनलाइन ट्रान्स्फर करण्याअगोदर उद्योजक तुरकर यांनी टाटा कंपनीतील मित्राला संपर्क करून ट्रकमालकाची माहिती व संपर्क नंबर मिळवला. थेट मोबाईलवर फोन करून जावेद शेख सत्तार (रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांच्याशी बोलणे झाल्यावर त्यांनी माझा ट्रक घराबाहेर जळगावला उभा असून, मी गुजरातकडे निघणार आहे, असे सांगितले. हे ऐकल्यावर तुरकर यांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ पेमेंट थांबविल्याने पुढील अनर्थ टळला.

ऑनलाइन बुकिंगचा गोरख धंदा

एखाद्या दूरच्या राज्यात गेल्यावर परतताना ट्रकचालकांकडून ऑनलाइन भाडे मिळते का, यासाठी शोध सुरू असतो आणि तेच सायबर गुन्हेगार हेरतात. जास्तीच्या भाड्याचे आमिष ट्रकचालकाला आणि कमी भाड्याचे प्रलोभन संबंधित उद्योजकाला किंवा ट्रान्स्पोर्टचालकाला देऊन दोन्हीकडून पैसे मिळवित फसवणूक केली जाते.