कोरोना चाचणी करा, अन्यथा दुकाने सील; दुकानदारांना पाच दिवसांची मुदत 

mla kishor patil
mla kishor patil

पाचोरा (जळगाव) : शहरातील सर्व लहान मोठे दुकानदार, टपरीधारक व हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येईल. प्रमाणपत्र नसणाऱ्यांची दुकाने सील करण्यात येतील, असा निर्णय शुक्रवारी (ता. १२) अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. दुकानदारांना कोरोना चाचणीसाठी पाच दिवसांचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

पाचोरा शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची रोजची वाढती संख्या पाहता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, यासाठी आमदार किशोर पाटील यांनी महसूल, पोलिस, आरोग्य, पालिका व पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच शुक्रवारी (ता. १२) प्रांताधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. या बैठकीस प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, सागर ढवळे (भडगाव), तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे, बीडीओ अतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील, रावसाहेब पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे, उपनिरिक्षक गणेश चौभे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया देवरे, डॉ. सागर सय्यासे, डॉ. प्रशांत बोरसे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी विलास सनेर, आमदारांचे स्वीय सहाय्यक राजेश पाटील आदी उपस्थित होते. 

पंधरा दिवसांचा घेतला आढावा
बैठकीत आमदार किशोर पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसांतील रुग्ण संख्येचा आढावा घेतला, तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. विविध मीडिया प्रतिनिधींनी कोरोना प्रतिबंधा ठी कोणत्याही विभागाकडून गांभीर्याने उपाययोजना केल्या जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत शहरातील प्रत्येक व्यावसायिकासाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली असून, त्यांना पाच दिवसांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. येत्या १८ मार्चपासून ज्या व्यावसायिकाकडे कोरोना चाचणी प्रमाणपत्र नसेल त्या व्यावसायिकांची दुकाने सील करण्याचे आदेशित केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com