
सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी भुरळ घातली. सशक्त व आत्मनिर्भर भारत करित असतांना प्रत्येक घरात गँस रहावा यासाठी उज्वला गँस योजना कार्यान्वीत केली. मात्र टप्या टप्याने महिनाभरात गँसचे दर शंभर रुपयाने वाढवत गरजु लोकांची जणु थट्टाच केली.
पारोळा (जळगाव) : केंद्र सरकारने घरगुती गँसचे दर प्रचंड वाढविल्याने गरीब व गरजु लोकांचे महीन्याचे बजेट कोलमडले आहे.याबाबत केंद्राने नागरिकांना केंद्रबिंदु मानीत गँस दरवाढीची कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हयाचे माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ सतीष पाटील यांनी केली आहे.
राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस महिला यांच्यावतीने केंद्र सरकारच्या गॅस दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभुमीवर डाँ. पाटील हे बोलतांना म्हणाले, कि सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदी यांनी भुरळ घातली. सशक्त व आत्मनिर्भर भारत करित असतांना प्रत्येक घरात गँस रहावा यासाठी उज्वला गँस योजना कार्यान्वीत केली. मात्र टप्या टप्याने महिनाभरात गँसचे दर शंभर रुपयाने वाढवत गरजु लोकांची जणु थट्टाच केली. यामुळे गावपातळीवरचा नागरिक पुन्हा चुलीकडे वडतांना दिसत आहे. ही शोकांतिका केंद्र सरकारच्या भुमिकेमुळे वाढतांना दिसत आहे. आधीच कोरोनाच्या सावटात आर्थिक घडी विस्कटलेली असतांना रोजगाराचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वयंपाकासाठी वापरला जाणारा एलपीजी गँस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देण्याऐवजी गँस दरवाढ करुन केंद्र सरकार सर्वसामान्यांची गळचेपी करित असल्याचे डाँ. पाटील म्हणाले.
रॉकेल झाले कालबाह्य
जिल्हयासह मतदार संघात आज देखील बरेच जण गरजेपुरता गँस वापरतो. उर्वरित स्वयंपाक वा लागणाऱ्या वस्तु चुलीवरच करित असतो. मात्र चुल पेटवितांना राँकेल मिळत नसल्याने शेवटी अनेक पर्याय शोधुन मार्ग काढतीत गृहिणी काम भागवीत आहे. केंद्राने रॉकेल जिल्हाबंदी असंवेदनशीलता दाखविली आहे. त्यामुळे जिल्हयात तरी रॉकेल कालबाह्य झाल्याचे चित्र आज डोळ्यासमोर आहे.
अंत्यविधीला डिझेल वा तुपाचा वापर
केंद्राने प्रभावी योजना राबविण्याऐवजी अनेक योजनांचा भडीमार केला. मात्र अनेक योजना निष्फळ ठरल्यात. शेवटच्या क्षणी सरपणावर रॉकेल मिळत नसल्याने शेवटी डिझेल, तुपाचा किंवा शेणखताचा गोवऱ्यांचा वापर करुन अंत्यविधी पार पाडला जातो. ही शोकांतिका असली तरी हे वास्तव चित्र केंद्राच्या धोरणामुळे निर्माण झाले आहे. याबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उठवुन सर्वसामान्य जनतेला न्यायाची भुमिका घेतली. केंद्र सरकार अगोदर गॅसवर सबसिडी देत होती. ती देखील बंद झाल्याने अनेकांनी महाग असलेली गॅस दरवाढ पाहता पुन्हा चुलीकडे कल वाढविला आहे. एकीकडे डिजीटल इंडीया, आत्मनिर्भर भारत करणारे केंद्र सरकार हे सर्वसामान्यांची दिशाभुल करित असल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी केला असुन केंद्राने गँस दरवाढ कमी केली नाही; तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर येवुन तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
संपादन ः राजेश सोनवणे