कॅरीबॅग विक्रेत्‍यांचे धाबे दणाणले; चार टन प्लॅस्‍टीक जप्ती

parola palika
parola palika

पारोळा (जळगाव) : शहरात सर्रासपणे प्लाँस्टीक कॅरीबॅग विक्री सुरु आहे. अनेक वेळा पालिकेच्या कर्मचारी व पथकाने कारवाईचे सत्र सुरु ठेवले असतांना देखील काही दुकानदार सर्रासपणे चोरून लपून प्लाँस्टीक कॅरीबॅग पिशवी विकत होते. याबाबत मुख्खाधिकारी ज्योती भगत पाटील यांनी कॅरीबॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे धाड टाकत जप्तीची करवाई केली.

प्लॅस्‍टीक कॅरीबॅग विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या घरातुन व गोडावूनमधुन प्लॅस्टीक कॅरीबॅगच्या वस्तू काढल्याने अनेकांना याची धडकी भरली. पालिकेच्या इतिहासातील ही मोठी कारवाई मानली जात असुन प्लॅस्टीक कॅरीबॅगचे उच्चाटन हेच आगामी मिशन असल्याचे दिसुन येत आहे. सदर या पथकात मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील, कर निरीक्षक संदीप साळुंखे, नगर अभियंता अभिषेक काकडे, अंतर्गत लेखापरीक्षक संदीप सानप, कनिष्ठ लिपिक एच. एम. पाटील, भूषण महाजन, नरेंद्र पाटील, अक्षय हाटकर, टी. डी. नरवाडे, आकाश चौधरी, नरेंद्र बेंडवाल, अनिल नरवाडे, संदीप पाटील, अभिजित मुंदाणकर, देवीका बोरसे, सचिन चौधरी इत्यादी कर्मचारी होते.

चार टन प्लाँस्टीक द्रोण जमा 
अनेक दिवसांपासुन सर्रासपणे प्लॅस्टीक कॅरीबॅग विक्री शहरात सुरु होती. व्यापारी हे गोडावुन व घरुन प्लॅस्टीक कॅरीबॅग विक्री करित होते. ही बाब पालिकेच्या लक्षात येताच त्यांनी घरातुन आणि गोडावूनमध्ये मुख्खाधिकारी ज्योती भगत पाटील यांचेसह पथकाने धाडी टाकीत तब्बल चार टन प्लॅस्टीक टॅक्टर व 407 गाडीने जमा करुन 40 हजार रुपयाचा दंड लावुन कारवाई केली.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com