दोन लाखाची मागणी करत पत्‍नीचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दोन लाखाची मागणी करत पत्‍नीचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
women torture
women torturewomen torture

पारोळा (जळगाव) : मोंढाळे प्र. अ. (ता.पारोळा) येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या (Married women torture) पतीने पुण्यात घरभाडे परवडत नाही म्हणून माहेरून दोन लाख रुपये आण अशी मागणी केली. ती मागणी विवाहितेने पूर्ण न केल्याने तिच्या पतीने विवाहितेस मानसिक शारीरिक त्रास दिला म्हणून चौगाव (जि. धुळे) येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा (Police fir) दाखल करण्यात आला आहे.

women torture
एका बापाची मुलाला साथ..एका मुलाची बापा विरुद्ध साक्ष

मोंढाळे प्र. अ. (ता. पारोळा) येथील सुनिता अंकुश पाटील हिने पोलिसात फिर्याद दिली आहे. यात म्‍हटले आहे की, तिचे पती अंकुशसोबत नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तेव्हापासून ती पुणे येथे राहत होती. चार वर्षापासून पती व सासरच्या मंडळींनी सांगितले की पुण्यात घरभाडे परवडत नाही. म्हणून तू तुझ्या वडिलांना नवीन घर घेण्यासाठी दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली विवाहितेने नकार दिल्यास तिला मानसिक शारीरिक त्रास देऊन मारहाण करत होते व तिला माहेरी पाठवून दिले.

women torture
ईदसाठी घरी निघालेल्या तरुणाचा मृत्यू; पाणी पिताना घडला अपघात

पतीने केली हद्द

तसेच विवाहितेच्या पतीने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मित्राच्या पत्नीशी प्रेम संबंध ठेवून बोरड (ता. तळोदा) येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या कारणामुळे विवाहितेने पारोळा पोलिसात अंकुश शिरसाठ, निर्मलाबाई शिरसाठ, भिका शिरसाठ, पंकज शिरसाठ, भगवान शिरसाठ (सर्व रा. चौगाव, जि. धुळे) अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

भादलीत एकाची आत्महत्त्या

जळगाव : तालुक्यातील भादली येथील ४५ वर्षीय व्यक्तीची मध्यरात्री राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किशोर रमेश नारखेडे (वय ४५) हे वृध्द आईसोबत राहतात. मिळेल ती मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. रात्री आईसोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री आई झोपेत असतांना किशोर नारखेडे यांनी राहत्या घरात दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांची आई सकाळी साडेसहाला नेहमीप्रमाणे उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे उघड झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com