नोकरीपेक्षा राजकारण बरे..पोलिस भरतीचे लेटर अन्‌ सरपंच आरक्षण एकाच दिवशी; त्‍याची पसंती गावकारभारी होण्याला

sarpanch
sarpanch

यावल (जळगाव) : नोकरीसाठी धडपडणाऱ्या तरुणांच्या व्यथा आपण दररोज विविध माध्यमांतून बघत, ऐकत असतो. मात्र, केंद्रीय राखीव पोलिस दलात भरतीसाठी मेडिकल ‘कॉल लेटर’ येऊनही त्यास धुडकावून लावत सरपंचपदाची धुरा सांभाळण्यात धन्यता मानणाऱ्या युवकाची अनोखी कथा तालुक्यातील दहिगाव येथील अजय अडकमोल या २४ वर्षीय तरुणाची आहे. 
दहिगाव गावात स्वातंत्रोत्तर काळात प्रथमच अनुसूचित जाती पदासाठी सरपंचपद राखीव निघाल्यामुळे येथे प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून अजय बाळू अडकमोल २५३ मते मिळवून विजयी झाले आहे. गावात तेरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जाती प्रवर्गातून एकमेव अजय अडकमोल सदस्य म्हणून विजयी झाले आहेत. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडतमध्ये निघालेल्या सोडतनुसार अजय अडकमोल अनुसूचित जाती प्रवर्गाचे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्यात जमा आहे. किंबहुना सरपंच आरक्षण सोडत जाहीर होताच त्यांची गावातून विजयी मिरवणूकही निघाली होती. 

कौटुंबिक पार्श्वभूमी... 
अजय अडकमोल यांचे घरात आई, वडील दोघं यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य राहून चुकले आहेत. त्यामुळे राजकीय वारसा घरात आहे. अजय घरात सर्वात धाकटे, थोरले बंधू रेल्वे पोलिस, चार बहिणी विवाहित, चारही मेहुणे पोलिसात, स्वतःस केंद्रीय राखीव पोलिस दलात भरतीसाठी संधी मिळूनही तिला लाथ मारून केवळ राजकारणात गोडी आणि समाजाला प्रथमच सरपंचपदाचा मान मिळणार म्हणून गावाच्या भल्यासाठी नोकरी झुगारून सरपंचपद मिळणार म्हणून अजयचे आई, वडीलही नोकरी गेल्याचे दुःख विसरून सरपंचपद व भविष्यात होणारा गावच्या विकासाचे स्वप्न रंगवत खूश आहेत. 

गाव अन् नाव उज्ज्वल करणार 
अजयचे शिक्षण बारावीपर्यंत (विज्ञान) होऊन त्यांची फैजपूर येथे जेटीएम कॉलेजला मॅकेनिकल डिप्लोमा शेवटच्या वर्षाला परीक्षा ऑनलाइन सुरू आहे. अजून ते अविवाहित आहेत. घरची परिस्थिती जेमतेम आहे. शेत बटाईवर करून रोजगार सुरू आहे. अवघ्या २४ वर्षांच्या अजयला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. त्यामुळेच त्यांनी चालून आलेल्या नोकरीला लाथ मारून समाजकारणास पसंती दिली असून, यातून गावासाठी नक्कीच चांगले काम करून समाजासह गावाचे नाव उज्ज्वल करण्याचा त्यांचा मानस आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com