esakal | मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यातच सरकार व्यस्त अन्‌ जनतेकडे दुर्लक्ष; खासदार रक्षा खडसेंचा आरोप 

बोलून बातमी शोधा

raksha khadse

मागच्या एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण बाहेर आले आहे; परंतु राजीनामा देण्यास उशीर झाला आहे. राज्यात जी काही गुन्हेगारी वाढते आहे. त्याला कुठे ना कुठे तरी लगाम बसला पाहिजे.

मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यातच सरकार व्यस्त अन्‌ जनतेकडे दुर्लक्ष; खासदार रक्षा खडसेंचा आरोप 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : राज्यातील सरकार मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यात व्यस्त आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी (ता. ५) येथे केला. 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याबाबत बोलताना खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, की राज्यात तीन पक्षांचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या. तिन्ही पक्षांतील नेत्यांनी त्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण करू शकले नाहीत. याउलट दर महिन्याला मंत्र्यांची नवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. पूर्ण मंत्रिमंडळ या मंत्र्यांची प्रकरणे मिटविण्यात व्यस्त असते. त्यामुळे आज जनतेच्या समस्या सोडविण्याकडे हे सरकार लक्ष देऊ शकत नाही. 

राजीनामा देण्यास उशीर
गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की मागच्या एक ते दीड महिन्यापासून हे प्रकरण बाहेर आले आहे; परंतु राजीनामा देण्यास उशीर झाला आहे. राज्यात जी काही गुन्हेगारी वाढते आहे. त्याला कुठे ना कुठे तरी लगाम बसला पाहिजे. भाजपच्या माध्यमातून आम्ही त्याबाबत अनेक वेळा निवेदन दिले आहे. 

जनतेची सेवा करण्याकडे लक्ष द्यावे
राज्याचे गृहमंत्री यांच्यावर जे आरोप झाले, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जी जनतेच्या रक्षणाची कामे व्हायला हवी होती, त्याऐवजी वसुलीची कामे झाल्याने पोलिसांचे लक्ष पूर्ण याच गोष्टीकडे वळले. त्यामुळे जनतेची कामे होऊ शकली नाहीत. आता न्यायालयाने चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश दिल्याने यात बरचशे मुद्दे बाहेर येतील. पोलिसांनी यापुढे केवळ जनतेची सेवा करण्याकडे लक्ष द्यावे, वसुलीकडे लक्ष देऊ नये. कारण हा त्यांचा व्यवसाय नाही. त्यांनी केवळ जनतेला सेवा देण्याचे कार्य करावे, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या. 

संपादन- राजेश सोनवणे