esakal | पत्‍नीला घेण्यासाठी निघालेल्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू
sakal

बोलून बातमी शोधा

road accident

पत्‍नीला घेण्यासाठी निघालेल्‍या पतीचा अपघाती मृत्‍यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

यावल : तालुक्यातील अट्रावल येथील विवाहिता पतीचे दारूचे व्यसन आणि त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी निघून गेली. तिला परत आणण्यासाठी निघालेला तिचा पती दुचाकी घसरून झालेल्या अपघातात (Road accident) गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (ता. २५) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. (accident-husband-death-bike-sleep-road)

हेही वाचा: फळविक्रेत्‍यांकडून पोलिसास मारहाण; अकरानंतर बाजार बंद करण्याचे कारण

अट्रावल येथील चंद्रकांत धनगर (वय ३१) यांच्या दारूच्या व्यसनामुळे पत्नी रोशनी धनगर (वय २८) त्रस्त होती. तो नेहमी तिच्यासोबत भांडण करीत असे. त्याच्या जाचास कंटाळून रोशनी धनगर अडीच वर्षीय मुलगी प्रांजल हिला घेऊन जामनेर येथे माहेरी निघून गेल्या. मंगळवारी (ता. २५) चंद्रकांत धनगर दुचाकी घेऊन अट्रावल (Jamner atrawal road) येथून पत्नीस आणण्यासाठी जामनेरला जाण्यासाठी निघाला.

गावाबाहेर निघाला अन्‌

गावाबाहेर दुचाकी घसरून (Bike accident) अपघात झाला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. डॉ. शुभम तिडके, अधिपरिचारिका नेपाली भोळे, सुमन राऊत, भूषण गाजरे, पिंटू बागूल आदींनी प्रथमोपचार केले व पुढील उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलला हलविण्यात आले.