विचित्र अपघात; दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाचा मृत्यु 

रईस शेख
Monday, 18 January 2021

गाव फाट्या जवळच त्यांच्या दुचाकीला ऑटो रिक्षाने मागुन धडक दिली. त्यात दुचाकी चालक गणेश धनगर याचा तोल जावून दोघेही रस्त्यावर दुरवर फेकले गेले.

जळगाव : चोपडा तालूक्यातील अडावद - मंगरुळ दरम्यान सुसाट ट्रकचालकाने ऑटो रिक्षाला धडक दिली रिक्षा चालकाने दुचाकीस्वारास धडकदेत पुढे चालणाऱ्या वाहनावर आदळली. या विचीत्र अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या अठरा वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला असून चालक किरकोळ जखमी झाला आहे. 

कमळगाव (ता.चोपडा) येथील शुभम शिवलाल धनगर (वय-१८) आणि गणेश रविंद्र धनगर (वय-२१) दोन्ही त्यांच्या ताब्यातील दुचाकीने अडावद कडून मंगरुळ कडे निघाले होते. गाव फाट्या जवळच त्यांच्या दुचाकीला ऑटो रिक्षाने मागुन धडक दिली. त्यात दुचाकी चालक गणेश धनगर याचा तोल जावून दोघेही रस्त्यावर दुरवर फेकले गेले. शुभमच्या अंगावरुन वाहनाचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. तर गणेश किरकोळ जखमी झाला. देाघांना तातडीने जळगावी हलवण्यात आले. जिल्‍हा रुग्णालयात तपासणी अंती डॉक्टरांनी शुभमचा मृत्यु झाल्याचे सांगताच कुटूंबीयांनी हंबरडा फोडत अक्रोश केला. शुभमच्या पश्चात शेतमजुर वडील शिवलाल, मोठा भाऊ गणेश, लहान भाऊ गोलू ऊर्फ प्रमोद आणि आई असा परिवार आहे. पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news road accident one death