रात्री सर्वांनी केले सोबत जेवण; सकाळी धक्‍कादायक प्रकार

तीन महिन्यांपासून जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामासाठी मजूरीचे कामासाठी आला आहे.
suicide case
suicide casesuicide case

जळगाव : रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतिय मजूराची शेताच्या बांधावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दोंदिया (पो. अम्बा जरूवाडीह जि. जरमुण्डी दुमका झारखंड) येथील मुळ रहिवासी असलेला संतोष रॉय भिम रॉय (वय २२) हा सध्‍या तिघ्रे (ता. जळगाव) येथे वास्‍तव्‍यास होता. सदर तरूण हा गेल्या तीन महिन्यांपासून जळगाव खुर्द व तिघ्रे शिवारातील रस्त्याच्या कामासाठी मजूरीचे कामासाठी आला आहे.

सहकाऱ्यांसोबत रात्री जेवण

रविवारी सोबत काम करणाऱ्या मजूरांसह त्याने रात्री जेवण केले व झोपून गेले. दरम्यान आज (ता. १९) सकाळी साडेनऊच्या सुमारास तिघ्रे शिवारातील शेनफडू पुंडलिक पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला रूमालाच्या सहाय्याने गळफास घेतल्‍याच्या अवस्‍थेत आढळून आला. यानंतर त्‍याला लागलीच गोदावरी रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी तपासणी केली असता त्‍यास मयत घोषीत केले. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि गणेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. रविंद्र इंधाटे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com