तरसोद फाट्याजवळ होणार उड्डाणपूल 

देवीदास वाणी
Sunday, 20 December 2020

तरसोद ते भादलीपर्यंतच्या मार्गावर कामात अडचणीचे ठरणारे झाडे, बस थांबा, विजेचे पोलचा अडथळा होता. अद्यापही पोल हलविण्यात आलेले नाही.

जळगाव : तरसोद ते फागणेदरम्यान महामार्ग चौपदीकरणाच्या कामाने अजूनही हवा तसा वेग घेतलेला नाही. नशिराबादकडून येणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण तरसोद फाट्यापर्यंत येऊन पोचले आहे. त्यापुढील तरसोद ते फागणेदरम्यान चौपदरीकरणाचे काम ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले आहे. आराखड्यानुसार तरसोद गावात वाहनांना, नागरिकांना येण्या-जाण्यासाठी व्हेइकल अंडरपास (उड्डाणपूल) होणार आहे. मात्र, या कामास अद्याप सुरवात झालेली नाही. 

हेपण वाचा- सुडाच्या राजकारणावर खडसे काय म्‍हणाले; महाजनांच्या आरोपावरील उत्‍तर वाचा

तरसोद ते फागणे महामार्गाचे चौपदरीकरण अनेक महिन्यांपासून रखडले होते. पावसाळ्यात सर्वच ठिकाणच्या चौपदरीकरणाचे कामे रखडली होती. पावसाळा झाल्यानंतर ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चरने कामास वेग देणे गरजेचे होते. मात्र अद्यापही त्यास हवी तशी गती देण्यात आली नाही. तरसोद ते भादलीपर्यंतच्या मार्गावर कामात अडचणीचे ठरणारे झाडे, बस थांबा, विजेचे पोलचा अडथळा होता. अद्यापही पोल हलविण्यात आलेले नाही. रस्ता खोलीकरणाची कामे संथगतीने सुरू आहेत. 

‘यू टर्न’ कधी
तरसोद ते फागणे महामार्गाच्या चौपदरकरणात तरसोदपासून असोद्याकडे जाणाऱ्या ‘यू’ टर्नच्या कामाला केव्हाच सुरवात होणे गरजेचे होते. चौपदरीकरणात तरसोद फाट्यासमोर व्हेइकल अंडरपास (व्हीयूपी) तयार करण्यात येणार आहे. २५ मीटर लांबीचा हा अंडरपास असेल. अगोदर नशिराबादकडून जळगावकडे जाणाऱ्या व जळगावकडून नशिराबादकडे जाणाऱ्या साइड रोडचे काम केले जाणार आहे. दोन्ही साइड रोडचे काम झाल्यानंतर ‘व्हीयूपी’चे काम हाती घेणार आहे. मात्र साइड रोडचे काम सुरू झालेले नाही. चौपदीकरणात अडथळा ठरणारा बस थांबा पाडण्यात आला आहे. विजेचे पोल, झाडे आहे तेथेच आहे. 

क्‍लिक करा - जळगावातील प्रमुख आणि ताज्‍या घडामोडी जाणून घेण्यासाठी 
 
एका महिन्याचे काम वर्षभरानंतरही होईना 
जुलै २०१९ ला तरसोद ते फागणे महामार्गाच्या कामांना सुरवात झाली. तरसोद फाटा ते भादली गावापर्यंतचे चौपदरीकरणाचे चार किलोमीटरचे काम अवघ्या एक ते दोन महिन्यांचे असल्याचे जाणकार सांगतात. मात्र दीड वर्ष झाल्यानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news tarsod over bridge work highway