दोन दुचाकींचा अपघात; अपघातानंतर दोन गटांत हाणामारी

दोन दुचाकींचा अपघात; अपघातानंतर दोन गटांत हाणामारी
two gat fight
two gat fighttwo gat fight

यावल (जळगाव) : तालुक्यातील निमगावजवळ दोन दुचाकींची धडक होऊन चार जण जखमी झाले. जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता याठिकाणी जखमींच्या नातेवाइकांनी दोन गटात आपसातच हाणामारी केली. यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस रुग्णालयात येताच पोलिसांसमोरच हाणामारी करणाऱ्या २० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर जखमींना जळगावात हलविण्यात आले आहे.

यावल - भुसावळ रस्त्याजवळ निमगाव येथे रविवारी (ता. ९) दुपारी बाराच्या सुमारास सुजित उत्तम पाटील (वय १८ ) व रोहन संजय अहिरे (वय १८) (दोघे रा. निमगाव) हे शेतातून दुचाकीवर घरी येत होते. तर इमामरजा खान समीर खान (वय २०) व अहमदरजा खान फिरोज खान (वय २०) (दोघे रा. सईदपुरा, यावल) हे भुसावळकडून यावलकडे येत होते. या वेळी या दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये हे चौघे जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. शुभम तिडके, अधिपरिचारिका मंजूषा कोळेकर, भूषण गाजरे यांनी उपचार केले. दरम्यान, रुग्णालयात आलेल्या जखमींच्या नातेवाईकांमध्ये आपसात ‘तू तू- मै मै’ होत त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या बाबत पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना माहिती देण्यात आली व रुग्णालयात पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलिस उपनिरीक्षक विनोद खंडबहाले, सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, ज्ञानेश्वर कोळी, सतीष भोई, राजेश महाजन, राजेश वाढेसह होमगार्ड आदी पथक रुग्णालयात दाखल झाले व हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटातील २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत

कुठेही किरकोळ अपघात जरी झाला तरी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते तर अनेकांनी तोंडाला मास्क देखील लावलेले नसते. रविवारी (ता.९) झालेल्या हाणामारीच्या घटनेत अनेकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत ‘तुम्ही मास्क द्या’, असे सांगून त्यांच्याशी हुज्जत घातली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com