esakal | नोकरीचे आमिष देत साडेतीन लाखात गंडवले
sakal

बोलून बातमी शोधा

job fraud

नोकरीचे आमिष देत साडेतीन लाखात गंडवले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : दोन्ही मुलांना शासकीय नोकरी (Goverment job)लावून देतो असे आमिष दाखवून ६० वर्षीय वृध्दाला ३ लाख ६० हजाराचा चुना (Fraud) लावणाऱ्या डोंबिवली येथील तरूणावर जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा (Jalgaon police) दाखल करण्यात आला आहे. (lakhs were wasted by luring him for a job)

यावल तालुक्यातील डोणगाव येथील ज्ञानेश्वर पाटील (वय ६०) त्यांची डोंबिवली येथील आप्पासाहेब बजबळकर यांच्याशी ओळख होती. आप्पासाहेब बजबळकर यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना त्यांच्या भुषण पाटील आणि उमेश पाटील अशा देान्ही मुलांना सरकारी नोकरी दाउन देतो असे आमीष दिले. दोन्ही मुलांना शासकीय नोकरी लागेल या अपेक्षेने ज्ञानेश्वर पाटील यांनी २०१७ आणि २०१८ मध्ये वेळोवेळी शहरातील गांधी उद्यानाजवळी स्वातंत्र्य चौकात एकुण ३ लाख ६० हजार रूपये रोख दिले.

हेही वाचा: कुत्र्याने हल्‍ला चढवत बालकाच्या गळ्यातच घेतला चावा

पैसे परत देण्यास टाळाटाळ

आप्पासाहेब बजबळकर यांनी नोकरीचे कागदपत्र न देता फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. नोकरीसाठी दिलेले पैसे देण्याचे टाळाटाळ केली. याप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आप्पासाहेब महादेव बजबळकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहे.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील चारशे शाळा ‘तंबाखू मुक्त’

दारूची विक्री; तीन जणांविरुध्द गुन्हा

शहरातील समतानगर आणि हरीविठ्ठलनगरात ब्लॅकने देशी दारूची विक्री करणाऱ्यांवर रामानंदनगर पोलीसांनी कारवाई करत तीन जणांकडून २ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस निरीक्षक अनील बडगुजर यांच्या पथकाने तीन ठिकाणी छापा टाकला. यात महेंद्र राणे (वय ४६ रा. समतानगर) यांच्याकडून १ हजार ७५० रूपये किंमतीची ३५ लीटर गावठी दारू, विशाल गारूंगे (वय ४६) यांच्याकडून २५० रूपये किंमतीची ५ लीटर गावठी दारून तर लक्ष्मी बाडगे (रा. हरीविठ्ठलनगर) हिच्याकडून ९०० रूपये किंमतीची १८ लीटर गावठी दारू असा एकूण २ हजार ९०० रूपये किंमतीची गावठी दारू हस्तगत केली. तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे.