यंदाही वन्यप्राणी गणना रद्द होणार; दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होते प्राणीगणना

यंदाही वन्यप्राणी गणना रद्द होणार; दरवर्षी बुद्धपौर्णिमेला होते प्राणीगणना
wildlife census
wildlife censuswildlife census

जळगाव : सद्यःस्थितीत कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी शासन निर्देशानुसार १५ टक्के कार्यालय कर्मचारी उपस्थितीसह परस्परांमधील ‘फिजिकल सोशल डिस्टन्स’ (Physical Social Distance) राखणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. परिणामी, वन्यप्राणी गणनेदरम्यान (wildlife census) एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यारात्री लख्ख प्रकाशात दर वर्षी वन, वन्यजीव विभागाकडून (Forest department) वन्यप्राणी गणना गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षीही गणना रद्द होण्याची शक्यता वन विभाग सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे. (wildlife census will be canceled again this year)

यावर्षी फेब्रुवारी मध्यापासून कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे शासनस्तरावरून निर्देशानुसार प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जिल्हा प्रशासनाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. दर वर्षी बुद्धपौर्णिमेला वार्षिक वन्यप्राणी गणना जिल्हाभरात वन्यजीव विभागासह वन विभागातर्फे केली जाते. गेल्या वर्षी राज्यात १३ मार्च २०२० च्या शासन आदेशानुसार साथरोग प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलबजावणी लागू करण्यात आली होती. २४ मार्च २०२० पासून संपूर्ण देशभरात लॉकडाउन लागू करण्यात येऊन सर्वच ठिकाणी जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानुसार ७ मे २०२० रोजी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी होणारी वार्षिक वन्य प्राणी गणना स्थगित करण्यात आल्याच्या सूचना मुख्य वनसंरक्षक (नाशिक) यांच्या निर्देशानुसार देण्यात आलेल्या होत्या.

wildlife census
मुलगी झाली हो..म्‍हणून त्‍यांनी काय काय केले!

सलग दुसरे वर्ष लॉकडाउनमध्ये

यावर्षी देखील फेब्रुवारी मध्यापासून पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यामुळे शासन निर्देशानुसार जिल्ह्यात १५ मेपर्यंत संचारबंदीसह लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दर वर्षी वन विभागाकडून होणाऱ्या वन्यप्राणी गणनेदरम्यान एका मचाणावर एकापेक्षा अधिक निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमींची संख्या असते. या संचारबंदी नियमांमुळे परस्परांमधील फिजिकल, सोशल डिस्टन्स’ राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच सद्यःस्थितीत विविध जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात प्रवेशबंदी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध वन परिक्षेत्रात निसर्गप्रेमी वन्यजीव प्रेमी व पर्यावरणप्रेमी अभ्यासक पोचू शकणार नाहीत. अशा सर्व बाबी लक्षात घेता या वर्षी २६ एप्रिलला बुद्धपौर्णिमेच्या दिवशी होणारी वार्षिक वन्य प्राणी गणना स्थगित होण्याची शक्यता असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.

बुद्धपौर्णिमेला प्रखर प्रकाश

दर वर्षी मे महिन्यातील बुद्धपौर्णिमेला चांदण्या रात्रीचा प्रकाश हा अन्य पौर्णिमेच्या रात्रींपेक्षा अधिक प्रखर असतो. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पाणस्थळे, अभयारण्यांमधील पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यासाठी येणारे वन्यप्राणी सहज टिपता येणे शक्य होते. कुठल्या प्रजातीचे वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरीक्षण मनोरे अथवा मचाणाजवळून मार्गस्थ झाले ते देखील सहजरीत्या नजरेस पडते. यासाठी कुठल्याही प्रकारची कृत्रिम प्रकाश योजनेची आवश्यकता भासत नाही. चांदण्या रात्रीचा प्रकाश नैसर्गिक असल्यामुळे वन्यजीवदेखील या प्रकाशाला घाबरत नाही. या पूर्वी दरवर्षी जिल्ह्यातील वन परिक्षेत्रात वार्षिक वन्यप्राणी गणना बुद्धपौर्णिमेला होत असते, अशी माहिती मानद वन्यजीव संरक्षक विवेक देसाई यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com