परिचारीकेचे काम सोडत परिवारासाठी एसटीचे स्‍टेअरिंग हाती

women bus driver
women bus driver
Updated on

मुक्ताईनगर (जळगाव) : महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. नोकरी असो किंवा राजकारण सर्वच ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. एवढंच नाही, तर सैन्यात दाखल होऊन महिला देशाचे रक्षण करीत आहेत. पण, तरीदेखील बसचालक महिला दिसली, की अनेकांच्या भुवया उंचावतात. मात्र, हे धाडसाचे येथील कन्येने लीलया पेलले आहे. सुषमा बोदडे- शिरसाठ यांची नुकतीच राज्य परिवहन महामंडळात (एसटी) चालक म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या ३८ वर्षांच्या सुषमा यांनी तालुक्यात पहिल्या बसचालक होण्याचा बहुमान मिळवला आहे. 
मुक्ताईनगर येथील कन्या सुषमा बोदडे-शिरसाठ यांचे सासर भडगाव तालुक्यातील वाक येथील आहे. परंतु त्या मुक्ताईनगर येथे खासगी रुग्णालयात परिचारिकेची ड्यूटी करीत असल्याने त्या तेथे वास्तव्यास आहे. सुषमा यांनी राज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. लेखी, मौखिक परीक्षा तसेच वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झाल्याने १ मार्च २०२१ पासून त्यांचे औरंगाबाद येथे प्रशिक्षण सुरू झाले आहे. मोठ्या उत्साहात आणि हिंमतीने त्यांनी एसटीचे स्टेअरिंग हातात धरले आहे. त्यांचे हे प्रशिक्षण वर्षभर सुरू राहणार आहे. त्यांची चालक व वाहक पदावर औरंगाबाद आगारात नियुक्ती झाली आहे. अल्पावधीतच त्यांनी वाहन चालविण्यात चांगला जम बसवल्याने सुषमा लवकरच बस चालवताना दिसणार आहेत, असे त्यांचे पती रोहिदास शिरसाठ यांनी सांगितले. यासाठी अवजड वाहनांचा परवाना असावा लागतो. यामधूनच बस चालविण्याची इच्छा पूर्ण झाली आहे, असे सुषमा बोदडे-शिरसाठ यांनी सांगितले. 

राजकारणातही कामाचा ठसा 
सुषमा यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुक्ताईनगरातच झाले आहे. त्यांचे पती रोहिदास शिरसाठ मुक्ताईनगर येथील एस. एम. महाविद्यालयात सुरक्षारक्षक आहेत. सुषमा यांना समाजकार्याची आवड असल्याने त्यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीचे उपजिल्हा संघटिका, जळगाव हे पद आहे. खासगी नोकरी सांभाळून त्यांनी राजकारणातही चांगला ठसा उमटविला आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shahada Bribery Case
Amarpani Mahadev Temple Incident Goes Viral in Nandurbar
Fake RPF Woman
What is the Jalgaon ACB bribery case in Parola?
Marathi News Esakal
www.esakal.com