esakal | बिहार पॅटर्नमधून साकारतेय वृक्षलागवड चळवळ;अनेकांच्या हाताला काम

बोलून बातमी शोधा

tree
बिहार पॅटर्नमधून साकारतेय वृक्षलागवड चळवळ;अनेकांच्या हाताला काम
sakal_logo
By
प्रा. हिरालाल पाटील

कळमसरे (ता. अमळनेर) : वृक्षलागवड काळाची गरज आहे याचे महत्त्व पटू लागले असले, तरी यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने अमळनेर तालुक्यात मागील वर्षापासून वृक्षलागवड मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याने हजारो वृक्षांची लागवड होऊन त्यांचे संगोपन होताना दिसून येत आहे.

हेही वाचा: उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये

दहीवद येथे बिहार पॅटर्नच्या माध्यमातून चार हजार १०० झाडे लावली असून, या माध्यमातून २० मजुरांना बारमाही रोजगार प्राप्त झाला आहे. जवखेडा येथे सहा हजार झाडे लावली असून, ३० मजुरांना रोजगार मिळाला आहे. हिंगोणे बुद्रुक येथे दोन हजार झाडे लावली असून, दहा मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. निम येथे दोन हजार, चौबारी एक हजार ५००, मठगव्हाण व म्हसले येथे ४०० झाडे बिहार पॅटर्नच्या माध्यमातून लावली आहेत. बिहार पॅटर्न बारा महिने चालणारा असून, या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना याबाबत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करून तालुक्यातील गावागावांत याबाबत जनजागृती मोहीम राबविली. यातून वृक्षलागवडीचे महत्त्व पटत असून, रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यातूनच या वर्षी पातोंडा, तरवाडे, निम, भोरटेक, दहीवद, जवखेडा या गावांनी बिहार पॅटर्नच्या माध्यमातून हजारो वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे.

हेही वाचा: महापालिका कोविड सेंटरमध्ये कोरोना बाधित जायेना

दहीवद गावाने या वर्षी बिहार पॅटर्नच्या माध्यमातून ३० हजार, जवखेडा ३० हजार, हिंगोणे बुद्रुक अकरा हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. सर्व ग्रामपंचायतींनी बिहार पॅटर्नच्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे, तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात व बांधावर वृक्षलागवड करण्याच्या कामाची मागणी करावी. १ मेपासून या कामाची सुरवात होणार आहे.

-संदीप वायाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर

संपादन- भूषण श्रीखंडे