esakal | उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये

बोलून बातमी शोधा

digiloker
उमवितील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रे आता ‘डिजिलॉकर’मध्ये
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना २२ व्या दीक्षांत समारंभा पासूनचे (सन २०१३) पदवी प्रमाणपत्र हे डिजीटल लॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर २९ व्या दीक्षांत समारंभात प्रदान केले जाणारे पदवी प्रमाणपत्र हे समारंभानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

हेही वाचा: रोगापेक्षा इलाज भंयकर..लसीकरण केंद्रावर धुमाकूळ !

विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रमाणपपत्र डिजीलॉकर मध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात दिलेल्या निर्देशान्वये उमविने ‘डिजीलॉकर’वर अकॅडेमिक अवार्ड रेकॉर्ड नोंदणी केली आहे.

हेही वाचा: VIDEO:धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !

सव्वा लाख प्रमाणपत्रे

त्यानुसार सन २०१३ अर्थात विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभापासून पदवी प्राप्त करणाऱ्या एकूण १ लाख २३ हजार ५६४ विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र हे डिजीलॉकर मध्ये डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यापीठाने यापूर्वी भारत सरकारच्या निर्देशानुसार यापूर्वीचे सर्व पदवी प्रमाणपत्र ही NAD च्या पोर्टलवर डिजीटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली होती.

असे मिळेल प्रमाणपत्र

यासाठी विद्यार्थ्यांनी digilocker.gov.in या संकेतस्थळावर किंवा digilocker हे ॲप मोबाईल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर Education ह्या विकल्पावर क्लिक करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे नाव निवडावे व नंतर पदवी प्रमाणपत्र हा विकल्प निवडून विद्यार्थ्याने आपली शैक्षणिक माहिती भरल्यानंतीर विद्यार्थ्याला त्याचे पदवी प्रमाणपत्र डिजीटल स्वरूपात ‘डिजीलॉकर’ने उपलब्ध होईल.

हेही वाचा: आजारी व्यक्तींनी घरी थांबू नका..वेळीच तपासणी करा !

सर्व ठिकाणी वैध, उपयुक्त

सदरचे डिजीटल पदवी प्रमाणपत्रावर डिजिटल साईन असून त्या माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० नुसार कायदेशीर वैधता राहील. याचा उपयोग नोकरी व शैक्षणिक कामासाठी उपयुक्त ठरणार आहे. २९ व्या दीक्षांत समारंभात पदवी प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज सादर केलेलया विद्यार्थ्यांना हे पदवी प्रमाणपत्र ३ मे, २०२१ रोजी दीक्षांत समारंभ झाल्यानंतर डिजिटललॉकरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे