esakal | आधी लढाई कोरोनाशी..मग गाठ विवाह बंधनाची, नियोजित वराची अनोखी शपथ !

बोलून बातमी शोधा

weeding

आधी लढाई कोरोनाशी..मग गाठ विवाह बंधनाची, नियोजित वराची अनोखी शपथ !

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर ः विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील सुखद क्षण असतो. अश्याच एका युवकाचा विवाह ठरला. सुखी क्षणाची स्वप्ने पाहत असताना या युवकाला सुरुवातीला कोरोनाने आपल्या बंधनात अडकविले. कोरोनावर त्याने यशस्वी मात करत विजय मिळविला. आपल्या वाट्याला आलेले यातना,दुःख अन्य कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून हा युवक विवाह बंधनात अडकविण्यापूर्वी आपल्या मित्रांच्या मदतीने एक वेगळीच धडपड करीत आहे. विवाहाचा क्षण येईपर्यंत कोरोना रोखण्यासाठीची यशस्वी मोहीम हाती घेतले आहे. "आधी लढाई कोरोनाशी.. मग गाठ विवाह बंधनाची" या अनोख्या विचाराने समाजकार्य करीत आहे. त्याच्या या कृतीचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.

हेही वाचा: VIDEO:धक्कादायक : परिचारिकांनी लशींची केली चोरी; रंगेहाथ नागरिकांनी पकडले !

तो युवक आहे बोहरा (ता. अमळनेर) येथील नियोजित वर केतन धनगर असून तो सोमवारी (ता.2) ला विवाह बंधनात अडकणार आहे. माणूस हा समाजशील प्राणी आहे. मानवधर्म पाळल्याशिवाय तो राहूच शकत नाही. याचाच प्रत्यय बोहरा (ता.अमळनेर) या गावात दिसून येत आहे. केतन धनगर या युवकाने राज्यशास्त्र या विषयात पदवीत्तर चे शिक्षण घेतले आहे. केतनचे वडील विश्वासराव वना रत्नपारखी यांचे वडिलोपार्जित शेळीपालनाचा व्यवसाय आहे. त्यातून घेतलेल्या शेतीवर दोघे भावंडे राबतात. गेल्या महिन्यात केतनला कोरोना झाला. सुखी स्वप्नांवर पाणी फिरेल की काय असे वाटत होते मात्र मारवड येथील डॉ . चेतन मुंदडा यांनी केतनवर योग्य उपचार केल्याने त्याने अल्पावधीतच कोरोनावर यशस्वी मात करून विजय मिळविला. आपल्या वाट्याला आले ते अन्य ग्रामस्थांच्या वाट्याला येऊ नये म्हणून विवाहबंधनात अडकण्यापूर्वी मित्रांच्या मदतीने विवाहाचा दिवस येईपर्यंत कोरोना रोखण्यासाठीची यशस्वी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार केतन धनगर या तरुणाने गावातील आपले सर्व जाती जमातीतील तरुण मित्र दिपक पाटील, शिवाजी कोळी , आबा कोळी , विलास रत्नपारखी, विजय मोरे , सचिन कोळी, संजय कोळी याना सोबत घेऊन कोरोनाला अटकाव करण्यासाठी गावात प्रबोधनाची मोहीम राबविली , पदरमोड करीत स्वखर्चाने घरोघर जाऊन हायड्रोक्लोरीनची फवारणी केली. मास्क नियमित वापरणे ही पण एकच लस आहे म्हणून त्यांनी गावात मोफत मास्क वाटप केले. हे करीत असतांनाच कोरोनाला दूर ठेवण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जागृती व प्रबोधनही सुरु ठेवले आणि आता लवकरच गावात स्वखर्चाने सॅनेटाईझर वाटपही करणार आहे. त्याच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा: भारतातील ही 10 ठिकाणे, जी तुम्हाला करणार आश्चर्यचकित !

सोमवारी अडकणार विवाह बंधनात

नियोजित केतन धनगर याचा विवाह धमनार (ता.साक्री) येथील नववधू सुवर्णा हिच्याशी सोमवारी (ता.2) मारवड- बोहरा रोडवरील वृंदावन धाम हनुमान मंदीरात विवाहबद्ध होणार आहेत. त्याच दिवशी केतनाचा लहान भाऊ स्वप्नीलचा देखील तेथेच विवाह होत आहे.

हेही वाचा: वाळू माफियांचे धाबे दणाणले; इन्स्पेक्टर उतरले नदीपात्रात !

कोण म्हणतंय तरुण बिघडले ? तरुण बी - घडत आहेत. हे आम्ही या उपक्रमातून सिद्ध करीत आहे. धडपडणाऱ्या मुलांचे प्रेरणास्थान असलेल्या साने गुरुजीच्या कर्मभूमीत हे कार्य होत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.' आधी लढाई कोरोनाशी , मग गाठ विवाह बंधनाची ' ही अनोखी शपथ या निमित्ताने पूर्णत्वास येणार आहे.

केतन धनगर, नियोजित वर बोहरा (ता.अमळनेर)

संपादन- भूषण श्रीखंडे