कोरोनामुक्त गावांसाठी ‘अकरासूत्री कार्यक्रम’ फायदेशीर ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Income Tax Commissioner Sandeep Kumar Salunkhe

कोरोनामुक्त गावांसाठी ‘अकरासूत्री कार्यक्रम’ फायदेशीर !अमळनेर : राज्यातील ग्रामीण (Rural) भागात वैद्यकीय सेवा (Medical Services) अतिशय तुटपुंज्या आहेत. त्यामुळे सध्याच्या महासाथीच्या वातावरणात शासकीय (Government) प्रयत्नांसोबत कोरोना (corona) होणारच नाही, यासाठी प्रतिबंधक उपाययोजना (Preventive measures) करणे हाच उत्तम उपाय आहे. ग्रामीण भागातील विकासकामांचा आतापर्यंतचा अनुभव व सर्वसामान्य जनतेच्या सवयी यानुसार कोरोनामुक्त गावांसाठी ‘अकरासूत्री कार्यक्रम’ ( Corona free Village Eleven formulas Program ) राबविल्यास कोरोनाला प्रतिबंध घालण्यात बरेच यश येईल, असे मत अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे (Income Tax Commissioner Sandeep Kumar Salunkhe) (पुणे) यांनी बोलतांना व्यक्त केले.

( Corona free Village Eleven formulas Program income Tax Commissioner Sandeep Kumar Salunkhe)

हेही वाचा: जळगाव शहरात लशींअभावी दोन लसीकरण केंद्र बंद

श्री. साळुंखे प्राप्तिकर विभागात वरिष्ठ अधिकारी असले तरी आपल्या मारवड (ता. अमळनेर) येथील जन्मभूमीशी नाळ जुळवून ठेवत लोकसहभागातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविले आहेत. त्यांनी विविध ‘विकास मंच’च्या माध्यमातून निर्माण केलेली पाणी चळवळ, सिंचन, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान वाखाणण्याजोगे आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी कोरोना महामारीला रोखण्यासाठी सुचविलेल्या उपाययोजना. श्री. साळुंखे यांनी सांगितले, की राष्ट्रीय स्तरावर निवृत्त प्राप्तिकर महानिदेशक आर. के. पालिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनामुक्त गाव संकल्पना राबविली जात आहे. त्याचाच ‘अकरासूत्री कार्यक्रम’ हा भाग आहे.


हेही वाचा: भुसावळ, मुक्ताईनगर ठरतांय कोरोनाचे 'हॉटस्पॉट'

‘अकरासूत्री कार्यक्रम’

१) ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच, ग्रामसेवक व सामाजिक काम करणारे स्वयंसेवक यांनी प्राथमिक शिक्षक, अंगणवाडीसेविका, आशाताई व इतर स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन या रोगाच्या भयानकतेविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण करावी. बचाव करण्याचे उपाय व घ्यावयाची काळजी याचे ज्ञानही द्यावे.

२) प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल कोविड नियंत्रण कक्ष स्थापन करून व त्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी व स्वयंसेवकांची मदत घेऊन बाधित रुग्ण ओळखणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती ओळखणे व आवश्यक तेथे विलगीकरण करणे याची एक व्यवस्था उभी करावी.

) कोरोनासदृश लक्षणे उदाहरणार्थ ताप, खोकला, दम लागणे, धाप लागणे, अचानक चव जाणे, अंगदुखी, वासाची संवेदना जाणे अशी लक्षणे आढळल्यास त्यांचे ताबडतोब विलगीकरण करणे व त्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्याची व्यवस्था करणे आणि अशा व्यक्ती इतर लोकांच्या व विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि लहान मुले यांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेणे.

४) मुखपट्ट्या (मास्क) घालणे, किमान सहा फुटांचे सामाजिक अंतर राखणे व वारंवार हात धुणे यांसारख्या सवयी रुजाव्यात म्हणून गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, धार्मिक नेते यांची मदत घेऊन त्याचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करणे.

५) धूम्रपान न करण्याबाबत विशेष जनजागृती करणे, गावातील व्यक्तींनी योगासने व प्राणायाम करावेत यासाठी उत्तेजन देणे.

६) ग्रामस्थांनी ताजे, आरोग्यदायी व शक्यतो सेंद्रिय अन्नपदार्थ आणि त्यातही जीवनसत्त्व ‘क’ असणारी लिंबूवर्गीय फळे खावीत, यासाठी जनजागृती करणे व उत्तेजन देणे.

७) ग्रामस्थांनी आवश्यकता नसल्यास गर्दी असणारी ठिकाणे, तालुक्याच्या शहरांमधील गर्दीची ठिकाणे, आठवडेबाजार यांसारख्या जागांना भेट देणे शक्यतो टाळावे.

८) गावात वारंवार येणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या भेटी कमीत कमी कशा करता येतील हे पाहणे.

९) गावाबाहेरून गावात येणारे कामगार, विद्यार्थी यांना किमान एक आठवड्यासाठी गावातील शाळा, पंचायतीचा हॉल, समाजमंदिर यांसारख्या सार्वजनिक इमारतींमध्ये विलगीकरणात ठेवणे.

१०) गावातील अंत्ययात्रांमध्ये गर्दी टाळणे. लग्नसमारंभामध्ये सरकारने घालून दिलेल्या दोन तासांच्या व २५ माणसांच्या अटींचे काटेकोर पालन करणे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक यांसारखे कार्यक्रम शक्यतो सध्यातरी रद्द करणे.

११) लवकरात लवकर सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी उत्तेजन देणे, गावातील अर्धवट ज्ञान असलेल्या वैद्यकीय माणसांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे. या अकरासूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यास आपल्याला गावागावांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश येईल, असा आत्मविश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.

( Corona free Village Eleven formulas Program income Tax Commissioner Sandeep Kumar Salunkhe)

Web Title: Marathi News Amalner Corona Free Village Eleven Formulas Program Income Tax Commissioner Sandeep Kumar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top