भुसावळ, मुक्ताईनगर ठरतांय कोरोनाचे 'हॉटस्पॉट' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

भुसावळ, मुक्ताईनगर ठरतांय कोरोनाचे 'हॉटस्पॉट'जळगाव : शहरासह चोपडा (chopda), अमळनेर (amalner) तालुक्यात काही प्रमाणात संसर्ग नियंत्रणात (Infection control) येत असला तरी आता कोरोनाचा (corona) विळखा मुक्ताईनगर (mukatainager) , भुसावळ (bhusawal) तालुक्यात घट्ट होताना दिसतोय. जिल्ह्यात दिवसभरात ११ मृत्यू (death) झाले तर नव्या बाधितांएवढेच बरे होणाऱ्यांचीही नोंद झाली.


( jalgaon distict bhusawal muktainagar 'hotspot' corona)

हेही वाचा: जळगाव शहरात लशींअभावी दोन लसीकरण केंद्र बंद

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून आणि विशेषत: मे महिना सुरु झाल्यापासून कोरोना संसर्गाचा आलेख स्थिर आहे. बुधवारी दिवसभरात ७ हजार ४२१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ८४९ नवे रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या १ लाख ३२ हजार ४२३ झाली आहे. तर ८४७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख २० हजार १५५वर पोचला.

बळींचा आकडा झाला कमी
गेल्या तीन-चार दिवसांपासून दररोजच्या बळींचा आकडाही कमी होत आहे. तीन दिवसांपासून मृत्युसंख्या १५च्या आत असून बुधवारीही केवळ ११ मृत्यू झाले. एकूण बळींचा आकडा २३७४ झाला आहे. सारी, कोविड निगेटिव्ह, न्युमोनिया, कोरोना संशयित आदींमुळे ८ मृत्यू झालेत.

हेही वाचा: लॉकडाऊन वाढवले तर..भाजप असहकार आंदोलन करणार !

जळगावात दिलासा
जळगाव शहरातील नवीन रुग्णसंख्या तीन दिवसांपासून शंभराच्या आत आढळून येत आहे. बुधवारीही शहरात ८६ रुग्ण आढळले तर १६२ रुग्ण बरे झाले.
अन्य ठिकाणी आढळलेले रुग्ण : जळगाव ग्रामीण २२, भुसावळ १६३, अमळनेर २६, चोपडा ४२, पाचोरा १५, भडगाव ८, धरणगाव १५, यावल २५, एरंडोल २२, जामनेर ६१, रावेर ५२, पारोळा १६, चाळीसगाव ४८, मुक्ताईनगर १७१, बोदवड ५१, अन्य जिल्ह्यातील २६.


( jalgaon distict bhusawal muktainagar 'hotspot' corona)

Web Title: Marathi News Jalgaon Distict Bhusawal Muktainagar Hotspot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :jalgaon news
go to top