जळगाव शहरात लशींअभावी दोन लसीकरण केंद्र बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव शहरात लशींअभावी दोन लसीकरण केंद्र बंद

जळगाव शहरात लशींअभावी दोन लसीकरण केंद्र बंद

जळगाव : शहरात दोन लसीकरण (vaccination center) केंद्रावरील लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने ते केंद्र आज दिवसभर बंद होते. इतर केंद्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी गर्दी (craud) केली होती. आज बहुतांश केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात आला होता. शासनाने अगोदर ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करावे, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नंतर करावे अशी भुमिका घेतल्याने लसीकरण करतांना हा बदल करण्यात आल्याचे चित्र होते. यामुळे आगामी काही दिवस तरी १८ ते ४४ वयोगटा लसीकरण केंद्र बंद असतील.


शहरातील शाहू महाराज, डी.बी. जैन, नानीबाई, कांताई नेत्रालय व शाहीर अमर शेख या केंद्रांवर ४५ वर्षांवरील लोकांना कोविशिल्डचा दुसरा डोस मिळाला. तर मुल्तानी हॉस्पिटल व स्वाध्याय भवन येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाइन नोंदणी नुसार कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आली.

लसी नाही केंद्र बंद

शहरातील रेडक्रॉस, चेतनदास मेहता रुग्णालयातील लसीकरण केंद्रे लसींअभावी बंद होते. शहरातील शाहू महाराज हॉस्पिटल, शिवाजीनगरातील रुग्णालय, रोटरी भवन, स्वाध्याय भवन (गणपतीनगर), मुलतानी हॉस्पिटल (मेहरुण), शाहीर अमरशेख दवाखाना (शनिपेठ), कांताई नेत्रालय (निमखेडी रोड) या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी झाली होती.

नवीन लसीकरण केंद्रे
शहरात लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता मंगळवार पासून चार नवीन लसीकरण केंद्रे शहरात सुरू करण्यात येणार आहे. सर्वच केंद्रांवर फक्त कोविशील्ड लसी देण्यात येतील. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने त्याची मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध झाल्यानंतर त्याही लसी देण्यात येतील.

टॅग्स :Coronavirusjalgaon news