मोबाईलवर पाठविला आधी संदेश, मग कर्जबाजारी तरुण शेतकऱयांने नदीत घेतली उडी !

हिरालाल पाटील
Thursday, 5 November 2020

आत्महत्या करण्याआधी त्या युवकाने अनेक नातेवाईकांना स्वतःच्या मोबाईल वरून आत्महत्या करीत असल्याचा संदेश ही पाठविला आणि घरी मात्र पत्नीला शिरपूर येथे जाऊन येतो असे सांगितले.

कळमसरे ः निम (ता.अमळनेर) येथील होतकरू 34 वर्षीय तरुण शेतकऱ्याची सतत दोन वर्षापासून अतिवृष्टीमूळे झालेली नापिकी व कर्ज बाजारीपणाच्या नव्याने घेतलेल्या ट्रॅक्टरचे हप्ते कसे फेडावे या विवंचनेतून नरडाने जवळील गिधाडेच्या पुलावरून तापी नदीत उडी मारून आपले जीवन संपविले. 

आवश्य वाचा- शिवसेनेचे चंद्रकांत पाटीलांना खुले आव्हान; जळगावातील भाजपचे पाच नगरसेवकांचे आगोदर राजीनामे घ्या, मग मंत्री ठाकूरांचा राजीनामा मागा ! 

निम येथील रामकृष्ण भिका धनगर वय 34 हा तरुण होतकरू शेतकरी म्हणून परिचित होता. ही घटना बुधवारी सायंकाळी मुंबई आग्रा रस्त्यावरील तापी पुलावर घडली. अंधार पडण्याची वेळ असतांना नरडाने पोलिसांनी त्या युवकाचा मृतदेह पट्टीच्या पोहणाऱ्याच्या मदतीने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलविला मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृत धनगर यांने सहामहिन्याच्या अंतराने कर्ज काढून दोन ट्रॅक्टर, थ्रेशर ,नांगर ,रोटाव्हीटर घेऊन मिळेल ते शेती कामे करून आपला उदरनिर्वाह करीत होता.

अतिवृष्टीमूळे हातातील पिके गेली

मात्र गेल्या वर्षी व चालू वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मूग ,ज्वारी ही वाया गेली तर कापूस पिकात बोड अडी पडून त्यामुळे ही उत्पादन कमी आल्याने घेतलेल्या ट्रॅक्टर आदी वाहनांचे कर्जाचे हप्ते कसे फेडावे या विवंचनेत हा युवा शेतकरी होता ,अखेर त्याने काल टोकाचे पाऊल टाकले व जीवन यात्रा संपविली. 

मोबाईलवर पाठविला आधी संदेश

आत्महत्या करण्याआधी त्या युवकाने अनेक नातेवाईकांना स्वतःच्या मोबाईल वरून आत्महत्या करीत असल्याचा संदेश ही पाठविला आणि घरी मात्र पत्नीला शिरपूर येथे जाऊन येतो असे सांगितले.नातेवाईकांनी घरी त्याचा आत्महत्या करण्याचा संदेशाची माहिती दिली आणि कुटुंबातील लोकांची धावपळ उडाली.

वाचा- सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णाचा जळगाव जिल्ह्यात मृत्यू नाही ! -

मासेमारी करणाऱया युवकांने काढला मृतदेह

मासेमारी करणाऱ्या युवकांच्या मदतीने अंधार पडायच्या आधी मृतदेह बाहेर काढल्यावर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्यावर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.  बुधवारी शवविच्छेदन होऊन दुपारी 12 वाजता निम येथे शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे पश्यात आई वडील पत्नी ,दोन मुले ,बहीण ,लहान भाऊ ,काका असा परिवार आहे ,याबाबत नरडाने ता शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner Debt-ridden young farmer commits suicide by jumping off Tapi river bridge