esakal | गावात स्वत: आदिवासी रणरागिणी उतरली मैदानात !

बोलून बातमी शोधा

गावात स्वत: आदिवासी रणरागिणी उतरली मैदानात !
गावात स्वत: आदिवासी रणरागिणी उतरली मैदानात !
sakal_logo
By
उमेश काटेअमळनेर : दहीवद (ता. अमळनेर) येथे कोरोनाने चांगलेच डोके वर काढले असून, गावात रुग्णसंख्येसह मृत्यूच्या घटनाही वाढल्या आहेत. अशा भयावह परिस्थितीत संसर्ग जास्त वाढू नये, यासाठी स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणेची वाट न बघता ग्रामपंचायत सदस्या हिराबाई भिल या आदिवासी रणरागिणी कोरोनाशी लढायला मैदानात उतरल्या आहेत.

हेही वाचा: सतत..सातपुडा पेटतोय; जंगली प्राण्यांचा होरपळुन मृत्यू !

आदिवासी वस्तीत कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी मागील वर्षापासून हिराबाई खूपच काळजी घेत होत्या; परंतु दुसऱ्या लाटेत कोरोना पोचलाच. परंतु संसर्ग जास्त वाढू नये म्हणून कोरोनाशी लढायला त्या मैदानात उतरल्या आहेत. हिराबाई यांची घरची परिस्थिती जेमतेम जरी असली तरी त्यांनी ज्या वॉर्डातील आपल्या आदिवासी मतदारांनी आपणास निःस्वार्थ निवडून दिले आहे, त्यांच्यासाठी आपल्या हातून अशा महामारीच्या संकटकाळी मदत म्हणून स्वखर्चाने सॅनिटायझर आणून पुरुषाप्रमाणे स्वतःच्या पाठीवर फवारणीपंप बांधून आपल्या वॉर्डात सॅनिटायझरची फवारणी करीत आहेत.

हेही वाचा: कोरोनामुळे या वर्षीही सासुरवाशीणींची आखाजी होणार सासरीच..!

मदतीचा दिला हात
गावातील आदिवासी वस्तीतील एक आदिवासी वयोवृद्ध महिला आठवड्यापासून आजारी होती. त्या महिलेकडे कोणाचेच लक्ष नव्हते. हिराबाई यांना याबाबत कळताच त्यांनी त्या वयोवृद्ध महिलेची भेट घेऊन विचारपूस केली. कोरोनाची लक्षणे समजताच हिराबाई यांनी पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधून तत्काळ रुग्णवाहिका बोलवून त्या महिलेला दवाखान्यात पाठविले. त्या महिलेचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आला. तिला ऑक्सिजनची गरज असल्याने तत्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांनी दवाखान्यात पाठविलेली आदिवासी वयोवृद्ध महिला ही कोरोनाला हरवून सुखरूप घरी आली आहे. त्यांच्या या कार्याबद्दल लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे हिराबाई भिल या रणरागिणीचे कौतुक करण्यात आले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे