esakal | कोरोनामुळे या वर्षीही सासुरवाशीणींची आखाजी होणार सासरीच..!

बोलून बातमी शोधा

aakhajee

कोरोनामुळे या वर्षीही सासुरवाशीणींची आखाजी होणार सासरीच..!

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच आहे. तीस एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन असून नंतर पुन्हा लाॅक डाऊन वाढविण्याची शक्यता आहे. खानदेशात ग्रामीण भागात चैत्र महिन्यातील बालकुमारी व सासुरवाशिण लेकींचा गौराई सण उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. नदीवरून अथवा जवळील शेतावरून गौरसाठी पाणी आणताृ येणार नाही. घरातच गौरची गाणी आणि पुजनाचा घरगुतीच उत्सव साजरा होत आहे. सासूरवाशीणींना सलग दुसर्‍या वर्षी माहेरी येणे दुरापस्त होणार आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर आलेली आखाजी सासूवाशीण लेकींविनाच साजरा होणार आहे.

हेही वाचा: मुस्लिम तरुणांकडून मानवता धर्माचे घडले प्रत्यक्ष दर्शन

'गौराई' हे खानदेशातील स्त्रियांचे ग्रामदैवत आहे. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयेच्या सणाला गौराईची पूजा बांधली जाते. चैत्र महिन्याच्या चतुर्दशीस घरोघरी गौरीची मांडणी केली जाते. सासुरवाशिणी या सणाला आवर्जून माहेरी येतात. गवराई लाकडाची असते. आखाजीला कुंभाराकडे मातीच्या घोड्यावर एका मातीच्या माणसाला बसवलेले असते. त्याच्यामागे डोक्यावर छत्री सारखे केलेले असते. त्याला शंकर म्हणतात. अक्षय तृतीया च्या दुसऱ्या दिवशी सर्व मुली शंकर व गौराईला नदीवर नेतात. शंकराला नदीत टाकून गौराईला घरी आणतात. गौराई त्या दिवसापासून सासरी गेली असे समजतात.

लाॅकडाऊन वाढण्याची शक्यता..

दरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपुर्ण लाॅकडाऊन आहे. पुढेही वाढणार असल्याची चिन्हे आहेतच. सासूरवाशिणी सलग दुसर्‍या वर्षी सासरी अडकणार आहेत. हमखास माहेरी येणार्‍या लेकींनाही येणे अशक्य आहे.

हेही वाचा: शिक्षण विभागाचा मदतीचा ‘ऑक्सिजन’

आई मी सासरीच थांबेन...

आखाजीला माहेरी येण्यास उत्सुक असणार्‍या आई व लेकींच्या डोळ्यांत आसवे तराळली आहेत. पण आई आपाापल्या कुटूंबांना येणार्‍या बर्‍याच आखाजी सण साजरे करायचा आहेत. तेव्हा एक अाखाजी बुडाली म्हणून काही होत नाही. आपण जिथे आहोत. तिथे सुरक्षित राहू..अशी भावनिक साद यावर्षीही लेकी आईला देवू लागल्यात आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे